Ashadhi Wari  Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : पंढरीच्या वारीची होणार जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद

Pandharpur Wari 2023 : विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत वारकरी पंढरपुरात येत असतात. लाडक्या विठुरायाचे दर्शनाची वारकऱ्यांना आस लागलेली असते.

Team Agrowon

Latest News Ashadhi Wari 2023 : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या आषाढी वारीचा सोहळा दिमाखात पार पडला. विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत वारकरी पंढरपुरात येत असतात. लाडक्या विठुरायाचे दर्शनाची वारकऱ्यांना आस लागलेली असते.

याच विठ्ठालाच्या आषाढी वारीची जागतिक वारसा स्थळांमध्ये (World Heritage) नोंद केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्यावतीने याबाबतची माहिती दिली आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत राज्यातील लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपुरला येतात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांव्यतिरिक्त राज्याच्या विविध भागातून अनेत संताच्या पालख्याही पंढरपुरच्या दिशेने आषाढी वारीसाठी येतात. याच आषाढीच्या वारीची आता जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद केली जाणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात याबाबातचा प्रस्ताव यनेस्कोला पाठविण्यात येणार आहे.

वारीचा इतिहास

तेराव्या शतकापूर्वीपासून आषाढी वारीची परंपरा सुरू करण्यात आली आहे. आळंदी आणि देहू येथून सुमारे २५० किलोमीटरचा पायी प्रवास करत लाखो वारकरी पंढरपुरात येतात. १६८५ मध्ये तुकाराम महाराजांचे वंशज नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला. तर १८३२ मध्ये हैबत बाबा महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला. वारीची ही परंपरा आजही अविरत सुरू आहे.

दरम्यान, वारीची ही परंपरा जागितक पातळीवर पोचावी, यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालायाने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून वारीचे चित्रिकरण पूर्ण करण्यात आले आहे.

वारीशी संबंधित सर्व साहित्य एकत्रित करण्यात येत असून येत्या दोन ते तीन महिन्यात युनेस्कोला याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व संत ज्ञानेश्वर महाराज व पालखी सोहळ्याचे प्रमुख विकास ढगे पाटील यांनी स्वागत केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT