Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : चाकणला नवीन कांदा दाखल

महात्मा फुले बाजारात बुधवारी (ता.२१) हंगामातील नव्या कांद्याची आवक सुरू झाली. शिंदे येथील रमेश केंदळे यांनी नवा कांदा बाजारात विक्रीसाठी आणलेला होता.

टीम ॲग्रोवन

चाकण, जि. पुणे : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात (ChakanAPMC) बुधवारी (ता.२१) हंगामातील नव्या कांद्याची आवक (Onion Arrival) सुरू झाली. शिंदे येथील रमेश केंदळे यांनी नवा कांदा बाजारात (Onion Market) विक्रीसाठी आणलेला होता. बाजारात साडेतीन हजार पिशव्यांची आवक झाली.

कांद्याला बाजारात प्रति किलोला चौदा ते अठरा रुपये भाव मिळाला. नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर जुना ही कांदा अल्प प्रमाणात विक्रीसाठी येत आहे, अशी माहिती व्यापारी विक्रम शिंदे, जमीरभाई काझी, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

खेड तालुक्यातील शिंदेगाव येथील रमेश केंदळे यांनी आज नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आणला होता. सध्या बाजारात वखारीत साठवलेला कांदा ही विक्रीसाठी येत आहे. हा कांदा स्थानिक परिसरातीलच आहे.

चाकण येथून देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी पाठविला जातो. दिल्ली, बंगळूरू, चेन्नई, केरळ तसेच उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, मुंबई, कोकण या भागात कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पाठविला जातो.

परराज्यातील व्यापारी कांदा खरेदीसाठी बाजारात येतात तसेच संपर्क साधून खरेदी करतात. नवीन कांद्याची आवक जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढेल त्यावेळी भाव काय राहतील हे सध्या तरी सांगता येत नाही परंतु भाव सध्या १४ ते १८ रुपये एका किलोला आहेत, असे व्यापारी विक्रम शिंदे, राम गोरे, जमीरभाई काझी, माणिक गोरे, संपत पानसरे, बाळासाहेब सातपुते यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

Citrus Spider Mite Infestation: लिंबूवर्गीय पिकांवरील जाळी-विणणारा कोळी

Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा १९ सप्टेंबरला मंुबईत धडकणार

SCROLL FOR NEXT