Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी परभणीत किसान सभेचे धरणे आंदोलन

खरीप २०२० आणि खरीप २०२१ मधील वादग्रस्त ४५ महसूल मंडळाची थकीत पीकविमा भरपाई तत्काळ अदा करावी.

टीम ॲग्रोवन

परभणी : यंदाच्या (२०२२) खरिपातील (Kharip Season) सोयाबीनसह (Soybean Crop) अन्य पिकांच्या नुकसानीबद्दल २५ टक्के अग्रिम पीकविमा भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ अदा करावी यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी (ता. १२) महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे परभणी येथे सत्याग्रह आणि धरणे आंदोलन करण्यात आले.

खरीप २०२० आणि खरीप २०२१ मधील वादग्रस्त ४५ महसूल मंडळाची थकीत पीकविमा भरपाई तत्काळ अदा करावी. रब्बी २०१८ मधील १९ हजार शेतकऱ्यांची थकीत विमा भरपाई अदा करावी. परभणी जिल्ह्यात ९१ हजार रुपये कोटी लुटणाऱ्या रिलायन्स विमा कंपनी करार भंगाची चौकशी करावी. सोनपेठ तालुक्‍यातील १ हजार ५०० शेतकऱ्यांच्या नोंदी गायब प्रकरणी चौकशी करावी.

भाव पाडण्यासाठी चालवलेली परदेशी कापसाची टॅक्स फ्री आयात तत्काळ रद्द करावी. परदेशी सोयाबीन आयातीवर निर्बंध घालावेत. रब्बी हंगाम २०२१-२२ हरभरा खरेदीचे चुकारे तत्काळ अदा करावेत महाएफसी विरुद्ध गुन्हा दाखल करावा. गाळप हंगाम २०२१-२२मध्ये साखर कारखान्यांच्या तोडणी व वाहतूक खर्चाचे व साखर उताऱ्याचे लेखा परीक्षण करा आणि किमान ३ हजार ५०० रुपये प्रति टन भाव द्यावी.

पूर परिस्थितीमुळे नादुरुस्त झालेल्या ग्रामीण रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी. चाळीस हजार एकर जमीन कोरडवाहू करणारा जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द करावा. भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करावी. पंतप्रधान सडक, मुख्यमंत्री सडक, राज्य मार्ग, बंधारे, लघु पाटबंधारे यातील जमिनीचा मोबदला २०१३ च्या कायद्याप्रमाणे द्यावी.

घरकुल योजनेत मोफत ५ ब्रास वाळू आणि ७० हजार रुपये विनातारण कर्ज द्यावा. सर्व गरिबांना रेशन कार्ड आणि अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा. वनाधिकार कायद्यानुसार वन व गायरान जमिनी करणाऱ्यांच्या नावे कराव्यात या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस काॅ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT