ताज्या बातम्या

Tur Production : अमरावतीत तुरीखालील क्षेत्र वाढण्याचा अंदाज

हमीभावापेक्षा मिळतोय तीन हजार रुपये जास्त दर

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Tur Production Amaravati :
अमरावती ः कापसात तेजीची (Cotton) अपेक्षा असताना त्याचे दर दबावात राहिले. याउलट तुरीला हमीभावापेक्षा (Tur MSP) तीन हजार रुपये अधिक मिळत आहे.

परिणामी यंदाच्या हंगामात तूर लागवड क्षेत्र पाच हजार हेक्‍टरने वाढण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली असून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने तुरीला गेल्या हंगामात ६६०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला. सुरुवातीला तुरीचे दरही काहीसे दबावात होते. संततधार पावसाचा फटका तुरीलादेखील बसल्याने यंदा उत्पादकता प्रभावीत झाली आहे.

परिणामी बाजारात तुरीची आवक मंदावल्याने तुरीच्या दरात दरदिवशी सुधारणा अनुभवली जात आहे.

अमरावती बाजार समितीत तुरीची सरासरी ३००० पोत्यांची आवक होत आहे. २४ मे रोजी किमान ८८०० ते कमाल ९२००, २५ रोजी किमान ८९०० ते कमाल ९२८०, २६ मे रोजी किमान ९१०० ते कमाल ९६०० आणि २७ मे रोजी किमान ९०५० ते कमाल ९४५० असा दर मिळाला.

त्यामुळे ६६०० रुपये हमीभावाच्या तुलनेत ३००० रुपये अधिक दर तुरीला मिळत आहे. चुकारादेखील रोख होत असल्याने शेतकऱ्यांचा कल तूर विक्रीवर आहे.

काही शेतकरी आणखी सुधारणा होईल या अपेक्षेने उशिरा विक्रीच्या विचारात आहेत.
तुलनेत कापसाला सुरुवातीला ८५०० तर आता ६९०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सोयाबीन दरही ४८०० रुपयांवर स्थिरावल्याने या दोन्ही पिकांतून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

परिणामी यंदा तुरीच्या लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे. सरासरीच्या तुलनेत पाच हजार हेक्‍टरने तूर क्षेत्र वाढेल, अशी शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

सुमारे १.१३ लाख हेक्‍टरवर तूर राहील, २.६० लाख हेक्‍टर कापूस, २.५५ लाख हेक्‍टर सोयाबीन, मूग ४८००, ज्वारी १५,०००, उडीद ९,९००, मका २२,५०० तर धान, भुईमूग व इतर पिकांखालील क्षेत्र ८६५० हेक्‍टर राहील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT