Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Transport : ‘ऊस वाहणाऱ्या वाहनांना 'रिफ्लेक्टिव्ह टेप' लावा’

Team Agrowon

नांदेड : जिल्ह्यातील ऊस वाहतूक (Transportation of Sugarcane)करणाऱ्या वाहनांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षितपणे ऊस वाहतूक करण्यासाठी कापडाचे परावर्तक किंवा रिफलेक्टीव टेप (रेडीयम) लावण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनास कापडाचे परावर्तक किंवा रिफ्लेक्टिव टेप (रेडियम) लावल्याशिवाय वाहतूक करू नये. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये होणाऱ्या वाहतुकीमध्ये दोन ट्रॉली एकत्र करून होणारी वाहतूक धोकादायक व बेकायदेशीर असून, वाहनामध्ये अतिरिक्त भार झाल्यास त्यांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या हेड समोर मोठया प्रमाणात शोभेच्या वस्तू लावण्यात येतात. त्यामुळे वाहनचालकास वाहन चालविताना समोरचे वाहन पाहण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी त्यांच्या वाहनासमोरील भागामध्ये शोभेच्या वस्तू लावण्यात आलेल्या असल्यास त्या काढून टाकाव्यात.

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास रिफ्लेक्टिव टेप (रेडियम) किंवा कापडाचे परावर्तक शुक्रवार १८ नोव्हेंबर पर्यंत लावावेत. शनिवार १९ नोव्हेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

ज्या वाहनास रिफ्लेक्टिव टेप (रेडियम) किंवा कापडाचे परावर्तक लावलेले नाही त्यांचे विरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. वाहनामध्ये ऊस भरत असताना अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावर वाहन उभे करण्यात येतात, त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होतात. त्याबाबत वाहनधारकांनी योग्य ती दक्षता घेऊनच योग्य रीतीने वाहन चालवावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT