Farm Pond Agrowon
ताज्या बातम्या

Farm Pond Scheme : ‘वैयक्तिक शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करा’

‘वैयक्तिक शेततळे’ घटकासाठी पुणे जिल्ह्याला २०२२-२३ या वर्षासाठी ४ कोटी ८० लाख रुपये इतक्या रकमेचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Agriculture Irrigation Scheme) ‘वैयक्तिक शेततळे’ (Farm Pond) घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’च्या www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइनरीत्या अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने करण्यात आले आहे.

‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर ‘वैयक्तिक शेततळे’ ही बाब कार्यान्वित करण्यात आलेली असून, याकरिता शेतकऱ्यांनी अर्ज करताना ‘सिंचन साधने व सुविधा’ या टॅबअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ या बाबीची निवड करावी.

त्यानंतर ‘इनलेट आणि आउटलेटसह’ किंवा ‘इनलेट आणि आउटलेट शिवाय’ यापैकी एका उपघटकाची निवड करावी. त्यानंतर ‘शेततळ्याचे आकारमान’ व ‘स्लोप’ची निवड करावी. अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

‘वैयक्तिक शेततळे’ घटकासाठी पुणे जिल्ह्याला २०२२-२३ या वर्षासाठी ४ कोटी ८० लाख रुपये इतक्या रकमेचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT