Sugar cane worker Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबटप्रवण क्षेत्रात शेतीची कामे करताना काळजी घेण्याचे आवाहन

जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे ऊस शेतीमध्ये सर्वत्र पाणी साचल्यामुळे बिबट व इतर वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधामध्ये मोकळ्या जागेवर, मनुष्य वस्तीवर येण्याच्या घटना वाढत आहेत. शेतीमध्ये काम करत असताना शेतकरी, मजुरांनी तसेच ऊसतोडणी करत असताना ऊसतोड मजुरांसोबत बिबट संघर्ष होण्याच्या घटना घडू शकतात.

Team Agrowon

नगर ः जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे ऊस शेतीमध्ये सर्वत्र पाणी साचल्यामुळे बिबट व इतर वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधामध्ये मोकळ्या जागेवर, मनुष्य वस्तीवर येण्याच्या घटना वाढत आहेत. शेतीमध्ये काम करत असताना शेतकरी, मजुरांनी तसेच ऊसतोडणी करत असताना ऊसतोड मजुरांसोबत (Sugarcane Labor) बिबट संघर्ष (Leopard Attack) होण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे मजूर, शेतकरी, कामगारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे.

सुवर्णा माने यांनी सांगितले, की मागील काही दिवसांपासून बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले व पशुधन जखमींची संख्या वाढलेली आहे.अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून बिबट वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे.

बिबट्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, अनेकदा त्यांना शेतीची कामे करत असताना खेळायला मोकळे सोडू नये, मुलांना ठेवले जाते तिथे हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, खूप वाकून शेतीची कामे करू नये, शेतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्ल्यूटूथ स्पीकरचा वापर करून मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवावीत.

यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. शेतीचे कामे करत असताना समुहाने कामे करावी. एकट्या व्यक्तीने शेतीची कामे करू नये, गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये अथवा दगड मारून पळवून लावण्याचा प्रयत्न करू नये अथवा मोबाईलने फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये.

शक्यतो शेतीची कामे करताना मानेभोवती हातरूमाल किंवा मफलर चा वापर करावा. रानमांजर व बिबट्याची पिल्ले आढळल्यास या पिलांच्या जवळ न जाता शेताची कामे थांबवावी. ही पिल्ले हातात उचलून घेऊ नये. माबिबट, पिल्ले आढळल्यास तत्काळ वनविभागास कळविणे आवश्यक आहे, असेही माने म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

SCROLL FOR NEXT