Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : कांदा खरेदीला कोणीही या, शेतकऱ्याला भाव द्या : भुजबळ

Chhagan Bhujabal : तेलंगणातील व्यापारी, तसेच बीआरएस पक्ष येथे येऊन कांदा खरेदी करीत आहेत, यात दुर्भाग्य वगैरे काही नाही.

Team Agrowon

Nashik News : तेलंगणातील व्यापारी, तसेच बीआरएस पक्ष येथे येऊन कांदा खरेदी करीत आहेत, यात दुर्भाग्य वगैरे काही नाही. आमचा कांदा परदेशात पाठवतोच ना, मग यात वावगे काही नसून कोणीही या आणि कांदा खरेदी करा. मात्र माझ्या शेतकऱ्याला भाव द्या, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत. तर आपल्या पोरा-बाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विरोधक एकत्र आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले होते.

याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘बावनकुळे यांच्या बोलण्याकडे एवढे लक्ष देण्याचे कारण नाही. सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, त्यांचे कामच आहे की सरकारला खाली खेचणे, त्यामुळे बावनकुळे यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही,’’ असे भुजबळ या वेळी म्हणाले.

‘‘पंतप्रधान मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. कार्यक्रम होत आहेत. जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हटले पाहिजे. मात्र मणिपूर येथील दंगलीत २५० पुरुष ठार झालेले आहेत. रस्त्यावर छळ सुरू आहे. तेथील परिस्थिती अवघड आहे.

हे राज्य चीनजवळ आहे. अशी संवेदनशील राज्ये प्रामुख्याने सांभाळली पाहिजेत. येथे गृहमंत्री अमित शहा गेले, मात्र पुढे काही झाले नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालून ही समस्या सोडवली पाहिजे,’’ असेही भुजबळ म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT