Farmer Death Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Death : आत्महत्या नियंत्रणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा

Agriculture Issue : यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथील प्रवीण काळे, खिडकी गावचे त्र्यंबक केराम, शिवणीचे मारोती चव्हाण, अर्जुना येथील गजानन शिंगणे, बाणगावचे रहिवासी तेविचंद राठोड यांनी गेल्या ४८ तासांत आत्महत्या केल्या.

Team Agrowon

Yavatmal News : आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या पाच कर्जबारी शेतकऱ्यांनी गेल्या ४८ तासांत आत्महत्या केल्या. याची दखल घेत संसदेच्या विशेष सत्रात आत्महत्या नियंत्रणासाठी उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथील प्रवीण काळे, खिडकी गावचे त्र्यंबक केराम, शिवणीचे मारोती चव्हाण, अर्जुना येथील गजानन शिंगणे, बाणगावचे रहिवासी तेविचंद राठोड यांनी गेल्या ४८ तासांत आत्महत्या केल्या.

विदर्भात २०२३ या वर्षात १५८४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. परंतु या संवेदनशील मुद्द्यावर शासनकर्त्यांची असंवेदनशीला समोर आली आहे. त्यामुळेच आत्महत्या नियंत्रणासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आलेला नाही.

राज्य व केंद्र सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे. विदर्भाच्या ग्रामीण भागात १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. कापूस, सोयाबीनमधील मंदी, ओला, तर कधी कोरडा दुष्काळ, उत्पादकते घट, निविष्ठा, मशागतीच्या दरातील वाढ अशा कारणांमुळे आत्मघातासारखा निर्णय घेण्यात येत आहे.

‘विशेष पॅकेज मिळावे’

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आपली जबाबदारी ओळखत विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी देखील किशोर तिवारी यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT