Animal Husbandry Agrowon
ताज्या बातम्या

Animal Husbandry : रत्नागिरीत पशुसंवर्धन कर्मचारी आक्रमक

सरकारने पशुसंवर्धन विभागात खासगीकरणाचा घाट घातला असून भरतीप्रक्रिया बंद केल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

Team Agrowon

रत्नागिरी ः सरकारने पशुसंवर्धन विभागात (Department of Animal Husbandry) खासगीकरणाचा घाट घातला असून भरतीप्रक्रिया (Recruitment) बंद केल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील १५३ पशुसंवर्धन रुग्णालयात काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.

जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या अखत्यारित येणारे पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यात १५३ पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आहेत. या दवाखान्यांमार्फत पशुधनाची निगा राखण्याचे काम केले जाते. जिल्ह्यात पशुधन वाढावे यासाठी पशुसंवर्धन विभागातील वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पशुधन वाढवण्याबरोबरच पशुधनाबाबत असलेल्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना पशुपालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वर्ग तीन व चारचे कर्मचारी करतात.

लिपिक, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई, परिचर, स्वच्छक अशी वेगवेगळी १९८ पदे जिल्ह्यात मंजूर आहेत. यातील केवळ ३५ पदे भरली गेली आहेत. तब्बल १६३ पदे रिक्त आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यापासून पशुधनाची निगा राखणे अशी अनेक कामे या कर्मचाऱ्यांद्वारे केली जातात; मात्र ही पदेच रद्द करण्याचा तसेच कनिष्ठ लिपिकची पदे कमी करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. यामुळे सोमवारपासून (ता. २८) काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

वाहनचालक, शिपाई ही पदे यापुढे भरली जाणार नाहीत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील लोकांना भविष्यात नोकरीचा लाभ मिळणार नाही. शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रस्तावित सुधारित आकृतीबंधामधील पदे निरास करण्याचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्यात यावा.

- विशाल यादव, जिल्हाध्यक्ष, पशुसंवर्धन कर्मचारी संघटना, रत्नागिरी

जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाची स्थिती

पद मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

सहायक आयुक्त ८ २ ६

पशुधन अधिकारी ४२ १८ २४

सहायक पशुधन अधिकारी २२ २० २

पर्यवेक्षक १६० ३६ १२४

वर्ग ३ १०३ १० ९३

वर्ग ४ ९५ २५ ७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT