Sugar Cane Harvester  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Harvesting : ऊस तोडी बंद करण्याचा ‘आंदोलन अंकुश’चा निर्धार

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर कारखानादारांची प्रतिनिधींची बैठक घेऊन दराचा तोडगा काढतो म्हणणाऱ्या खासदार, आमदारांना फेटे बांधून घ्यायला वेळ आहे.

Team Agrowon

कोल्हापूर : पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर कारखानादारांची (sugarcane) प्रतिनिधींची बैठक घेऊन दराचा तोडगा काढतो म्हणणाऱ्या खासदार, आमदारांना फेटे बांधून घ्यायला वेळ आहे. ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सोमवारपासून (ता. ७) ऊस तोडी बंद, कारखान्यांची गट कार्यालये बंद, वाहतूक बंदचा निर्धार ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केला.

उदगाव (ता. शिरोळ) येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावर सोमवारी (ता. ७) दुपारी साडेबारा वाजता आंदोलन अंकुशच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या वेळी चुडमुंगे म्हणाले, की कारखानदार शेतकऱ्यांना फसवत आहेत. अडचणीत असणारे कारखाने उच्चांकी दर देत असताना चांगले कारखाने चांगला दर का देऊ शकत नाहीत.

लोकप्रतिनिधी कारखानदारांना जाब विचारत नाहीत. तातडीने बैठक घ्यावी यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयासमोर उद्यापासून (ता. ८) बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.

जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली टोलनाका परिसरात बंदोबस्त तैनात होता. नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी ‘आंदोलन अंकुश’चे निवेदन स्वीकारले. अप्पासाहेब कदम, संभाजी शिंदे, भूषण गंगावणे, दीपक पाटील, अक्षय पाटील, उदय होगले, राकेश जगदाळे, आदम मुजावर, अभिजीत पाटील, आशाराणी पाटील, शांताबाई तेली उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT