Koyna Dam satara agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्राची तहान भागवणाऱ्या कोयनेच्या पाणी पातळीत वाढ, जलाशय ९० टक्क्यांवर

Koyna Dam Satara : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या जलाशयात थेंबे थेंबे तळे भरे अशी परिस्थिती झाली आहे.

sandeep Shirguppe

Koyna Dam Rain : मागच्या ४ महिन्यात राज्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील अनेक धरणे अद्यापही निम्मी भरली नाहीत. दरम्यान महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या जलाशयात थेंबे थेंबे तळे भरे अशी परिस्थिती झाली आहे. मागच्या चार महिन्यात ९० टक्क्यांवर पाणी पातळी गेली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे.

तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाला असून, २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मागच्या चार महिन्यांपासून थोडे थोडे का होईना ९० टीएमसीपर्यंत कोयनेचा जलसाठा गेला आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान पुढच्या काही दिवसांत आणखी पडण्याची गरज आहे.

मागच्या ४ महिन्यात अल निनोच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. जुलै महिना सोडल्यास उर्वरित महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली. तर सप्टेंबर महिनाही अर्ध्याहून अधिक संपला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पावसाची तूट कायम आहे.

मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठा वाढू लागला आहे. २४ तासांत कोयनानगर येथे २९ तर नवजाला २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरला ५३ मिलिमीटर पडल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे वेळेत भरली होती. गतवर्षी १९ सप्टेंबरला कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा अजून ९० टीएमसीचा टप्पाही पार केलेला नाही. तर गतवर्षी आतापर्यंत कोयनेला ४४३४ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर नवजाला ५३९० आणि महाबळेश्वरला ५७९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

चांदोली धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

चांदोली धरण आज सकाळी सातला १०० टक्के भरले. ३४. ४० टीएमसी साठवणक्षमता असणारे वारणा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लाभक्षेत्राशिवाय लातूर, सोलापूर जिल्ह्याचे लक्ष होते. पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी धरण प्रशासनाने वीजनिर्मिती ठप्प केली होती.

सध्या वारणा डावा कालवा प्रवाहित ठेवला असून, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले असून, चोवीस तासांत ३७ मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातून ३७७० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असणारी वीजनिर्मिती जनित्रे सुरू ठेवून ४५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT