Alphonso Mango On EMI
Alphonso Mango On EMI Agrowon
ताज्या बातम्या

Alphonso Mango On EMI : पुणे तिथे काय उणे ; चक्क हापूस आंबा मिळतोय हप्त्यावर

Team Agrowon

Pune Mango Market : आपल्या विशिष्ठ चवीसाठी हापूस आंबा (Alphonso Mango) प्रसिध्द आहे. त्यामुळेच आंब्याला फळांचा राजा (King Of Fruits) असंही म्हटले जाते. यंदाचा आंब्याचा हंगाम (Mango Season) सुरू झाला आहे. सध्या बाजारात आंब्याचे दर (Mango Rate) तेजीत आहेत.

त्यामुळे आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्यां सामान्यांसाठी हापूस आंब्याची चव अजून तरी आवाक्याबाहेरच आहे. पण आता सामान्यांनाही हापूसची चव चाखायला मिळणार आहे. पुण्यात आता मासिक हप्त्यावर (इएमआय) (EMI) आंब्याची पेटी घेता येणार आहे.

आजपर्यंत आपल्याला गाडी, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, होम अप्लायन्सेस या सारख्या वस्तू इएमआयवर खरेदी करता यायच्या. मात्र, पुण्यातील गौरव सणस या व्यावसायिकाने ग्राहकांसाठी चक्क इएमआयवर आंबा उपलब्ध करून दिला आहे.

त्यामुळे आता आवाक्याबाहेर असलेल्या हापूसची चव सामान्या ग्राहकांनाही चाखता येणार आहे.

देशातील पहिलाच प्रयोग -

गेल्या अनेक वर्षांपासून गौरव हे पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. गुरूकृपा ट्रेडर्स अॅण्ड फ्रुट प्रॉडक्ट या आपल्या फळे विक्रिच्या दुकानात यंदा त्यांनी इएमआयवर आंबे विकण्याची अभिनव कल्पना राबविली आहे.

आतापर्यंत दोन ग्राहकांनी त्यांच्याकडून इएमआयवर आंब्यांची खरेदी केली आहे. अशाप्रकारे आंबे विक्रीचा हा भारतातील पहिलाचा प्रयोग असल्याचा दावाही गौरव यांनी केला आहे.

सामान्या माणूस अनेक महागड्या वस्तू इएमआयवर खरेदी करतात. अनेकांना आंब्याची चव चाखता यावी, यासाठी आम्ही आंबे इएमआयवर विकण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गौरव यांचे म्हणणे आहे.

आंबा खरेदीसाठी अटी -

ग्राहक ज्याप्रमाणे इएमआयवर मोबाईल खरेदी करतात, त्याच पध्दतीने ग्राहकांना इएमआयवर आंबे खरेदी करता येणार आहेत. इएमआयवर आंबे खरेदीसाठी ग्राहकाकडे क्रेडीट कार्ड असणे आवश्यक आहे.

ग्राहक खरेदी केलेल्या आंब्यांची रक्कम तीन, सहा किंवा १२ महिन्यांच्या हप्त्यांमध्ये भरू शकतो. यासाठी ग्राहकाला कमीत कमी पाच हजार रुपये किमतींच्या आंब्यांची खरेदी करणे आवश्यक आहे.

सध्या एक डझन हापूस आंब्याचा दर ८०० ते १००० रुपयांच्या घरात आहे. यंदा हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंब्याचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिमाणी बाजारात आंब्याचे दर तेजीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT