Mango Production : यंदा आंबा उत्पादनात घट

विक्रमगड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
 Mango
MangoAgrowon

Vikramgad : विक्रमगड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. आंबापीक हे हंगामी असल्याने मध्येच अवकाळी पाऊस व ढगाळ वातावणाचा सामना या पिकाला करावा लागला. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबा बागायतदारांचे नुकसान (Mango Producer Loss) झालेले आहे.

काही भागात आंबा मोहर करपून व गळून गेला आहे; तर काही भागात आंबा फळधारणा झालेली फळे गळून गेली आहेत. त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम तोट्यात गेला असल्याचे येथील आंबा बागायतदारांनी सांगितले. त्यामुळे यंदा आंब्यांचा स्वाद दुर्मिळ झालेला आहे.

विक्रमगड व परिसरात आंब्याचे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर आहे. कैरी गळल्यामुळे गावठी आंब्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

अजूनही काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे कैरीची गळती झाली असून त्याचा परिणाम यंदाच्या आंबा उत्पन्नावर होताना दिसत आहे.

 Mango
Hapus Mango Market : हापूस आंब्याची आवक वाढली; दरही उतरले

अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जंगल भागात कैरीची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने यंदा कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, कैरीचे पन्हे आदी स्वाद हा दुर्मिळ झाली आहे. येव्हाना कच्ची कैरी बाजारात दाखल होते. ती अद्यापही दाखल झालेली नाही.

तालुक्याच्या ग्रामीण भागातील डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात जंगली आंब्यांची झाडे आहेत. ही जंगल संपत्ती येथील आदिवासी कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन आहे. जंगल भागात येणारा आंबा कैरी बाजारात विकून हे आदिवासी आपला चरितार्थ या हंगामात चालवतात.

मागील पंधरवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कैरीची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. याचा फटका आंब्याच्या हंगामाला बसला आहे. रायवळी, राती, लिटी अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जंगली भागातील गावठी आंब्याला फटका बसला आहे.

अवकाळी पावसामुळे आंब्याचा चांगला आलेला हंगाम वाया गेला आहे. शिवाय काजू पिकालाही फटका बसला आहे. या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे मोहर गळती, मोहर करपणे, झालेली फळधारणा गळून जाणे असे मोठे नुकसान सहन करावे लागल्याने यंदा आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. आंबा खाणाऱ्यांचीदेखील मोठी पंचाईत होणार आहे.
आनंद महाले, आंबा बागायदार, खुडेद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com