PDKV Akola Agrowon
ताज्या बातम्या

PDKV, Akola : ‘पंदेकृवि’ च्या कुलगुरू निवडीकडे सर्वांच्या नजरा

राज्यपालांनी घेतल्या अंतिम पाच जणांच्या मुलाखती

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV, Akola) नवीन कुलगुरू (vice-chancellor) निवडीसाठी शोध समितीनंतर आता राज्यपालांनी अंतिम मुलाखती घेतल्या आहेत. या पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाच जणांनी बुधवारी (ता.७ ) राजभवनात निवडीच्या दृष्टीने अंतिम मुलाखती दिल्या. यात विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्यासह इतर पाच जणांचा सहभाग होता.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे या पदावर नवीन व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. जवळपास ३० जणांनी अर्ज केले. शोध समितीने त्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम पाच जणांची नावे राजभवनाकडे पाठविली होती. या नावांमध्ये डॉ. खर्चे यांच्यासह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक अशोककुमार पात्रा (भोपाळ), भारतीय कापूस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. विजय वाघमारे (नागपूर), महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख (राहुरी, नगर) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर (परभणी) या पाच जणांचा समावेश होता. या सर्वांच्या मुलाखती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतल्या. आता पाच पैकी कुणाची ते या पदावर वर्णी लावतात, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान ‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदाचा प्रभार अमरावती येथील गाडगे बाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी स्वीकारला आहे.

डॉ. खर्चे यांचा दावा मजबूत
संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे हे अंतिम पाचमध्ये आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या विविध पदांवर कामे केली आहेत. यापूर्वी ते परभणी कुलगुरू निवडीवेळी अंतिम पाच उमेदवारांमध्ये होते. खर्चे यांचा अनुभव, स्थानिक विभागाची माहिती पाहता त्यांचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. मात्र, निवडीसाठी काय निकष लावले जातात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT