‘पंदेकृवि’ला सप्टेंबरमध्ये मिळणार नवे कुलगुरू

शोध समितीची स्थापना; अर्ज प्रक्रियेला सुरुवात
Agriculture University
Agriculture UniversityAgrowon

अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होत असल्याने या पदावर नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी शोध समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने सोमवार (ता. २७) पर्यंत पात्र उमेदवारांकडून कुलगुरू पदासाठी अर्ज मागविले आहेत. शोध समितीने डॉ. एन. पी. साहू यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

कुलगुरू डॉ. भाले यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे. सप्टेंबरमध्येच ते ६५ वर्षांचे होत असल्याने वयोमानानुसार ते या पदावरून सेवानिवृत्तही होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या पदासाठी पात्र असलेल्या व्यक्तीकडून चार प्रतींमध्ये आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात आला आहे. अर्जामध्ये पालक विभाग/संस्था/संस्थेकडील अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि अर्जदाराविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित किंवा प्रलंबित नसल्याबद्दल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जांमधून शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना शोध समितीसोबत चर्चेसाठी आमंत्रित केले जाऊ शकते.

नवीन कुलगुरूंकडे नजरा

तीन महिन्यांनी ‘पंदेकृवि’ला नवीन कुलगुरू मिळणार आहेत. याची प्रक्रिया सुरू झाली. ११ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरील व्यक्तीसमोर अनेक आव्हाने असतात. प्रामुख्याने विद्यापीठांतर्गत चालणारे कुरघोडीचे राजकारण, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोबतीने कामकाज चालवणे, पूर्व व पश्‍चिम विदर्भातील भौगोलिकतेचा विचार करून संशोधनाची दिशा ठरवणे, विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांचा कारभार, कृषी महाविद्यालयांतील शैक्षणिक दर्जाचा स्तर उंचावणे, अशा विविध पातळ्यांवर त्यांना नेतृत्व करावे लागते. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर कुणाची वर्णी लागते याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाल्या. अर्जप्रक्रिया सुरू झाली असून, २७ जूननंतर किती जणांनी या पदासाठी इच्छा दाखवली ते स्पष्ट होईल. त्यानंतर आलेल्या अर्जातून कुणाची वर्णी लावली जाते हेही तितकेच महत्त्वाचे राहते.

पात्रता आणि अनुभव -

- कृषी किंवा संबंधित क्षेत्रात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) मिळवलेली असावी.

- कृषी किंवा संबंधित क्षेत्रातील अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचा २० वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान आठ वर्षे प्राध्यापक किंवा समकक्ष दर्जा असावा.

- किमान तीन वर्षे प्रशासकीयसह प्राध्यापक म्हणून किमान १० वर्षांचा अनुभव या काही प्रमुख पात्रता देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर बाबी पूर्ण करणे गरजे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com