Zilla Parishad Akola Agrowon
ताज्या बातम्या

Zilla Parishad Akola : अकोला जिल्हा परिषदेचा राष्ट्रपती करणार सन्मान

जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण यशस्वीपणे केलेल्या कार्याची दखल घेत अकोला जिल्हा परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारारिता मंत्रालयाचा वर्ष २०२१ चा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.

Team Agrowon

अकोला ः जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण यशस्वीपणे केलेल्या कार्याची दखल घेत अकोला जिल्हा परिषदेला (Zilla Parishad Akola) केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारारिता मंत्रालयाचा वर्ष २०२१ चा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे. ३ डिसेंबरला जागतिक अंपगदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

अपंगत्वावर मात करीत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात येते. विविध श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात अकोला जिल्हा परिषदेला दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

योजनांचा लाभ मिळणे सुकर

आकोला जिल्हा परिषदेने आरोग्य आणि समाज कल्याण विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झाले आहे .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Policy: महाराष्ट्राची जल-परंपरा आणि आधुनिक जलनीती

Pulse Beetle Identification,: कडधान्य साठवणुकीतील भुंगेऱ्याची ओळख

Organic Farming: सेंद्रिय शेती अन् पारंपरिक वाणांचा वारसा जपणाऱ्या ‘वैशालीताई’

Women Empowerment Story: महिला गटातून प्रक्रिया उद्योगाला चालना

Weekly Weather: तापमान वाढ, ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT