Ajit Pawar On Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar: नुकसान भरपाईवरुन अजित पवार संतापले

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही मदत निधी वाटप केली नाही.

Team Agrowon

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (farmer) कुठलीही मदत निधी (Crop Insurance) वाटप केली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात अजून दमडीही आलेली नाही. राज्य सरकारकडून  नुसत्या घोषणा केल्या जातायत, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते आज (ता. 4 नोव्हें) पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. राज्य सरकारकडून मात्र नुकसान भरपाईच्या नुसत्या घोषणा केला जातात. शेतकऱ्यांच्या हातात दमडीही आलेली नाही. उलट पंचनामे करणारे अधिकारीच शेतकऱ्यांना पैसे मागतात. सरकार अशावेळी काय करत ? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

पंचनामे करणारे अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत असल्याच्या घटनेकडे त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. अलीकडेच नगर जिल्ह्यात पंचनामे करणाऱ्या महसूलच्या पथकाने एकरी चारशे रुपये शेतकऱ्याला मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

निकष डावलून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली, असं मुख्यमंत्री सांगतात. मात्र शेतकऱ्यांच्या हातात अजून दमडीही नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरही मत व्यक्त केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT