Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : पशुधनावरील गंभीर धोका दूर करा ः अजित पवार

देशातील राजस्थान, पंजाब, हरियानासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाही विषाणूजन्य ‘लम्पी स्कीन’चा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Mahesh Gaikwad, टीम ॲग्रोवन

मुंबई : देशातील राजस्थान, पंजाब, हरियानासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाही (Livestock Infected By Lumpy Skin) विषाणूजन्य ‘लम्पी स्कीन’चा गंभीर (Lumpy Skin Disease) धोका निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यांतल्या ५९ तालुक्यांत हजारो जनावरे या आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

पशुधनांमधील वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘लम्पी स्कीन’ आजाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात राज्यात दूधउत्पादनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, ते राज्याला परवडणारे नाही, असेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत मिळावी

‘लम्पी स्कीन’ आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT