Bribe  Agrowon
ताज्या बातम्या

Bribe News : दोन हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक

कृषी पर्यवेक्षक सोनवणे यांच्याबद्दल ठिबक लाभार्थी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

Team Agrowon

Nashik News : मालेगाव, जि. नाशिक : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ठिबक सिंचनासाठी (Drip Irrigation) लाभार्थी म्हणून निवड झालेली झाली. त्यामुळे तक्रारदार व त्यांच्या भावाने शेतजमिनीवर फळबाग लागवड (Orchard Cultivation) करून ठिबक सिंचनाचे काम केले.

त्याच्या फाइलची तपासणी करून बिले ऑनलाइन अपलोड करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक सुधाकर विश्वनाथ सोनवणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

कृषी पर्यवेक्षक सोनवणे यांच्याबद्दल ठिबक लाभार्थी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक नारायण न्याहळदे, पोलिस निरीक्षक साधना भोये- बेलगावकर व सहकाऱ्यांनी सापळा रचून कौळाणे (निं) (ता. मालेगाव) येथील बस थांब्याजवळ बंद टपरीसमोर लाच स्वीकारताना सुधाकर सोनवणे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

मंगळवारी (ता. २१) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यासाठी ४१० कोटींचा निधी मंजूर

Gokul Dudh Sangh: 'डिबेंचर'चा मुद्दा; दूध उत्पादक आक्रमक,...तर गोकुळ दूध संघाला शनिवारपासून दूध पुरवठा थांबवणार?

Crop Loss Compensation : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई, संपूर्ण कर्जमुक्त करा

Rabi Season : जळगावात रब्बीतही असणार खतांची मोठी मागणी

Onion Cultivation : खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

SCROLL FOR NEXT