Arrest In Bribe : प्रभारी कृषी पर्यवेक्षक ३ हजारांची लाच घेताना अटकेत

सिंदखेडराजा येथील राजर्षी शाहू पतसंस्थेसमोर हा देवाणघेवाणीचा व्यवहार सुरू असताना डोणे यांना ताब्यात घेण्यात आले.
Areest In Bribe
Areest In BribeAgrowon
Published on
Updated on

बुलडाणा : मंजूर झालेल्या कृषी यंत्रसामग्रीची (Agriculture Empilements) पाहणी करून त्याचा ऑनलाइन अहवाल सादर करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Officer) कार्यालयातील प्रभारी कृषी पर्यवेक्षक (Agricultural Supervisor in Charge) हरिभाऊ उत्तम डोणे (वय ३४) याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption Department) सोमवारी (ता. १६) अटक (Arrest In Bribe) केली.

सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी येथील तक्रारदाराच्या आईच्या नावे महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मंजूर झालेल्या पॉवर विडर व चॉप कटर या यंत्रसामग्रीची मोका पाहणी करून वरिष्ठांना ऑनलाइन अहवाल सादर करायचा होता.

हे काम करण्यासाठी हरिभाऊ डोणे याने तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सोमवारी (ता. १७) सापळा रचण्यात आला.

सिंदखेडराजा येथील राजर्षी शाहू पतसंस्थेसमोर हा देवाणघेवाणीचा व्यवहार सुरू असताना डोणे यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही अटक करण्यात आली.

Areest In Bribe
Agro Tourism : नियोजन, कष्टांतून साकारलेले मुलूख कृषी पर्यटन केंद्र

सिंदखेडराजाची बदनामी

या तालुक्यात काही महिन्यांपूर्वी सिंचन घोटाळा समोर आलेला आहे. जीएसटीच्या बनावट पावत्या सादर करून पैसे उकळण्याचे काम झाल्याचे समोर आले होते.

या प्रकरणात विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.आता पुन्हा सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गतच प्रभारी कृषी पर्यवेक्षकाला अटक झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com