Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe News : दहा हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकाला अटक

Team Agrowon

Solapur News : : कृषी मशागतीसाठी लागणारे पॅावर टिलरचे अनुदान मिळविण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणात करमाळ्यातील कृषी पर्यवेक्षक भारत मारुती शेंडे यांनी पडताळणी रिपोर्ट न जोडल्याने लाभार्थी लाभापासून वंचित राहिला होता. त्यास ते अनुदान मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेंडे यांना सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत माहिती अशी, की करमाळा येथील तक्रारदार यांनी त्यांचे शेतीच्या कामासाठी त्यांच्या पत्नीच्या नावे महाराष्ट्र शासनाच्या महा-डीबीटी या पोर्टलवर पॉवर टिलर खरेदीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदानासाठी, ३० मे २३ रोजी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने सोडत होऊन तक्रारदार यांना पॉवर टिलर खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती मिळाली होती.

त्यानुसार तक्रारदार यांनी पॉवर टिलर खरेदी करून त्याबाबतची सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली. त्यानंतर कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यांनी तक्रारदार यांचे पॉवर टिलरची पडताळणी करून खरेदीची सर्व कागदपत्रे तक्रारदार यांच्याकडून घेतली होती.

परंतु त्यांनी पडताळणी रिपोर्ट सबमिट न केल्याने तक्रारदार यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले नव्हते. त्यामुळे तक्रारदार यांनी शेंडे यांना संपर्क केला, त्यांनी तक्रारदार यांचे पडताळणी रिपोर्ट सबमिट करण्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली.

त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीसंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा, सोलापूर येथे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने १५ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली आणि सापळा रचून यातील संशयित आरोपी कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे याला १० हजारांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT