Agrowon Sanvad Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Management : तंत्रज्ञानाच्या आधारे शेती व्यवस्थापन करावे

Soil Test : माती परीक्षण करून कपाशी किंवा सोयाबीनची लागवड करून एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादकता खर्च कमी होतो.

Team Agrowon

Yavatmal News : माती परीक्षण करून कपाशी किंवा सोयाबीनची लागवड करून एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादकता खर्च कमी होतो. प्रगत तंत्रज्ञानासाठी देखील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र किंवा विद्यापीठ तज्ज्ञांच्या संपर्कात राहून त्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेती व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे, असे आवाहन विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी केले. ते तालुक्यातील अकोला (बाजार) येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.

‘अ‍ॅग्रोवन’ व कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या वतीने अकोला (बाजार) येथे गुरुवारी (ता. २०) ‘कपाशी व सोयाबीन पिकांचे व्यवस्थापन’ यावर चर्चासत्र पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश राजूरकर होते. डॉ. सुरेश नेमाडे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, कोरोमंडलचे सहायक महाव्यवस्थापक शिवप्रकाश श्रीवास्तव, कृषी विद्यावेत्ता विजय साखरे, जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्र सिंग आदींनी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार राजकुमार भीतकर, वितरण व्यवस्थापक शशिकांत भोयर, उपसरपंच प्रवीण मोगरे, सीमा कृषी केंद्राचे संचालक आरीफ बुधवानी, कारोमंडलचे एमडीटी भूषण लिखार व आकाश ठाकरे उपस्थित होते.

कपाशी व सोयाबीनच्या उत्पादकता वाढीत सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यासाठीच्या उपाययोजना तसेच एकात्मीक कीड नियंत्रणाच्या पद्धतीविषयीची माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी दिली. शेतकरी रामभाऊ कराळे, स्वप्नील जगताप, हुरुसिंग जाधव, विलास कन्नावा यांचा सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन ‘सकाळ’चे बातमीदार प्रवीण देवतळे यांनी केले. कुऱ्हाचे बातमीदार भगवान चहांदे, पवन मिश्रा, ‘अ‍ॅग्रोवन’चे सहायक व्यवस्थापक सुनील धांडे यांनी आभार मानले.

दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीचे क्षेत्र घटत आहे. अन्नधान्याचे उत्पादन वाढीसाठी योग्य खतांचा वापर करावा लागणार आहे. खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे लागणार आहे.
- शिवशंकर श्रीवास्तव, सहायक महाव्यवस्थापक, कोरोमंडल इंटरनॅशनल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT