Seeds agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department Nashik : बोगस बियाणांचा सुळसुळाट, तब्बल १३ लाखांचे बियाणे जप्त

Team Agrowon

Nashik Farmers : सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकरी पेरण्यांच्या करण्यात व्यस्त आहे. अशातच बोगस बियाणे आणि मुदत बाह्य औषधांची विक्री सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

दरम्यान याप्रकरणी नाशिक कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १३ लाखांचे बियाणे जप्त केल्याची माहिती देण्यात आली.

नाशिक जिल्हा भरारी पथकाने शहरातील द्वारका परिसरात एका दुकानात धाड टाकत मुदत बाह्य कांदा पिकाचे ४४२.५ किलो बियाणे जप्त करण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या पाश्वभुमीवर कृषी विभागाने केलेल्या कारवाईने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर बोगस, मुदतबाह्य बियाने विकणाऱ्या दुकानदारांना चांगलाच चाप बसला आहे.

नाशिक जिल्ह्यात बोगस बियाणांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. दरम्यान याप्रकरणी कृषी विभाग सापळा रचत द्वारका परिसरातील मे.अभिजीत सीडस प्रा ली या बियाणे कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत मान्यता नसलेला तसेच मुदत बाह्य कांदा पिकाचे सुमारे ५०० ग्रॅमचे ८८५ पाकिटे (४४२.५ किलो बियाणे) जप्त केले.

या कारवाईत कृषी विभागाने तब्बल १३ लक्ष ७ हजार ६८० रुपये बियाणे जप्त केली. दरम्यान या बियाणांची विक्री करण्यासाठी पॅकिंग करण्याची प्रक्रिया सुरू होती. या धाडीनंतर भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईस विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक विवेक सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांच्या नेतृत्वात जिल्हा भरारी पथकातील जगदीश पाटील, कृषी उपसंचालक संजय शेवाळे, तंत्र अधिकारी (गुनि) तसेच मोहीम अधिकारी अभिजीत जमधडे, अभिजीत घुमरे, तंत्र अधिकारी नितेंद्र पाणपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जगन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT