Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : परतीच्या पावसाने जिल्ह्यात दाणादाण

टीम ॲग्रोवन

पुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) शेतीचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथे ११९.५ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने ठिकठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिले. तर अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. सोमवारी (ता. १७) रात्री जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे प्रत्येक शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. डाळिंब, ऊस, सूर्यफूल, भाजीपाला यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

जिरायती पट्ट्यामध्ये देखील अतिवृष्टीचा पाऊस झाला. नाझरे धरण परिसरातही झालेल्या पावसामुळे धरण भरून वाहून लागल्यामुळे कऱ्हा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. नदीला पाणी सोडल्याने नदीकाठच्या अनेक घरांना फटका बसला असून, नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुणे शहरातही अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

अनेकांच्या घरांत, दुकांनामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तर कोथरूड, चिंचवड भागांत हलका पाऊस पडला. मुळशीतील पौड, घोटावडे, माले, मुठे, पिरंगुट, मावळमधील काले, कार्ला, खडकाळा, शिवणे, वेल्ह्यातील पानशेत, विंझर, जुन्नरमधील निमगाव सावा, बेल्हा, राजूर, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, कडूस, इंदापुरातील इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

पाऊस ८० मिलिमीटरपेक्षा पडलेली ठिकाणे

तळेगाव ११९.०, पुणे वेधशाळा १०७, केशवनगर १०७, खडकवासला ९७.५,खेड ८८.८, वडगाव ८३.५, न्हावरा ८३.५, पाटस ८२.८, वरवंड ८३.५,

मंगळवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये

हवेली ः थेऊर ४०.५, उरुळीकांचन ४८.०, भोसरी ४६.३, कळस ८०.८, हडपसर ७५.३, वाघोली ४५

मुळशी ः थेरगाव ५५.०,

भोर ः भोर, भोलावडे ३६.५, नसरापूर ५७.०, किकवी ३६.५, वेळू ६१.३, आंबवडे ३३.५, संगमनेर ३६.५, निगुडघर ३३.५.

मावळ ः वडगाव मावळ ३८.०, तळेगाव ७२.०, लोणावळा ३६.०,

वेल्हा ः आंबवणे ४१.५

जुन्नर ः जुन्नर ४६.३, नारायणगाव ६६.८, वडगाव आनंद ४३.३, डिंगोरे ३१.०, आपटाळे ३०.८, ओतूर ४९.३

खेड ः पाईट ४५.५, चाकण ४७.५, आळंदी ७१.०, पिंपळगाव ६५.५, कन्हेरसर ६७.३,

आंबेगाव ः घोडेगाव ६८.५, आंबेगाव ७०.८, कळंब ६८.०, पारगाव ७२.३, मंचर ७१.८

शिरूर ः टाकळी ७१.०, मलठण ६८.०, रांजणगाव ९३.५, पाबळ ७५.०, शिरूर ६५.५

बारामती ः माळेगाव ५१.०, पणदरे ३७.८, वडगाव ६५.५, लोणी १०२, सुपा ७३.३, मोरगाव ४९.०, उंडवडी ६५.०

इंदापूर ः भिगवण ७४.५, अंथुर्णी ६५.३, सणसर ५२.५

दौंड ः देऊळगाव ४४.०, यवत ३८.०, कडेगाव ७३.०, राहू ६८.०, रावणगाव ४९.०, दौंड ५३.०

पुरंदर ः सासवड ६८.८, भिवंडी ४२.३, कुंभारवळण ५३.३, जेजुरी ४७.०, परिंचे ५१.३, राजेवाडी ६६.५, वाल्हा ६८.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा फसवीच

Sugar Market : दर नियंत्रणासाठी साखरविक्री कोटावाढीचा केंद्राचा सपाटा

Hapus Mango Export : रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनानला रवाना

Heat Wave : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

SCROLL FOR NEXT