Agriculture Processing  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Processing : पुरंदरमधील प्रक्रिया उद्योगास कृषी आयुक्तांची भेट

राज्याचे कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी नुकताच राज्याच्या कृषी खात्याच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पुरंदर तालुक्यातील कृषीविषयक विविध नावीन्यपूर्ण प्रक्रिया उपक्रमांना शनिवारी (ता. १०) भेट देत विविध माहिती जाणून घेतली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्याचे कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी नुकताच राज्याच्या कृषी खात्याच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पुरंदर तालुक्यातील कृषीविषयक विविध नावीन्यपूर्ण प्रक्रिया उपक्रमांना शनिवारी (ता. १०) भेट देत विविध माहिती जाणून घेतली. त्यांच्यासमवेत कृषी विभागाच्या निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे कृषी संचालक दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव आदी उपस्थित होते.

कृषी आयुक्तांनी जाधववाडी येथील पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या प्रक्रिया उद्योगास भेट दिली. यावेळी अतुल कडलग यांनी कंपनीने फळांपासून तयार केलेल्या उत्पादनांविषयी माहिती दिली. आयुक्तांनी कंपनीने केलेल्या प्रगतीबद्दल सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. उत्पादन ते विक्री व्यवस्थेतील अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. त्या वेळी पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनीने अंजीर ब्रेड स्प्रेड, पेरू ब्रेड स्प्रेड, आंबा स्प्रेड इत्यादी उत्पादनांची माहिती दिली. कयानी बेकरीमार्फत पुरंदर पेरू पासून तयार केलेला केक आयुक्तांना भेट दिला.

मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत स्थापन झालेल्या श्रीकृष्ण कोल्ड स्टोरेज कंपनी, काळेवाडी या प्रकल्पास भेट दिली. त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील व रेवणनाथ जाधव यांनी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या उत्पादनांची माहिती दिली. सीताफळ, अंजीर, पेरू, चिकू अशा २३ प्रकारच्या फळांचे काम चालू असल्याबाबत आवर्जून सांगितले. महाराष्ट्रातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजूर असलेली पहिली महिलाबहुल शेतकरी कंपनी पुरंदर लक्ष्मी शेतकरी महिला कंपनीस आयुक्तांनी भेट दिली. कामाची पाहणी करून कंपनीतील महिलांशी संवाद साधून अडचणींबाबत चर्चा केली. तसेच कंपनीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. विपणन व्यवस्थेतील उणिवांवर पुढील काळात काम करणार असल्याचा विश्वास सर्व उपस्थितांना दिला. महाराष्ट्रातील पहिली महिलांची कंपनी स्थापन केल्याबद्दल कंपनीतील सर्व महिलांचे अभिनंदन केले. कृषी विभागामार्फत चालू असलेल्या कामाबद्दल चर्चा करून समाधान व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Villages Success Story: वाघ्याची वाडी झाली ‘पाणीदार’

Jaggery Adulteration: भेसळीचे गुऱ्हाळ

Village Development Success Story: हरित वैभवाची वंजारवाडी

Marathi Language: मराठी भाषा : ओढा कमी, ताण अधिक

Tanker Water Supply: पुरंदरमधील १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

SCROLL FOR NEXT