सोयाबीन प्रक्रिया उद्योगास चालना देणार : कृषिमंत्री दादा भुसे

परभणी : ‘‘बियाण्याची निवड, उगवणक्षमता तपासणी, पेरणीपासून काढणीपर्यंत, काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. येत्या काळात मराठवाड्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील’’, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

परभणी : ‘‘बियाण्याची निवड, उगवणक्षमता तपासणी, पेरणीपासून काढणीपर्यंत, काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. येत्या काळात मराठवाड्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील’’, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प आणि नाहेप प्रकल्‍प यांच्यातर्फे बुधवार (ता.१९) ते शुक्रवार (ता.२१) या कालावधीत आयोजित सोयाबीनवरील ऑनलाइन कार्यशाळेच्या समोरापाप्रसंगी शुक्रवारी (ता.२१) भुसे बोलत होते. कुलगुरु डॉ.अशोक ढवण  अध्यक्षस्थानी होते. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, सोयाबीन संशोधन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्‍हेत्रे, विस्‍तार कृषी विद्यावेता डॉ. उद्धव आळसे उपस्थित होते.  

श्री. भुसे म्‍हणाले, ‘‘सोयाबीन हे राज्यातील कपाशीनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्‍वाचे पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढील वर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेत २५ ते ३० टक्के वाढीचे उद्दिष्ट ठेवावे. कृषी विभागासह सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावा. सोयाबीनची पेरणी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पध्‍दतीने केल्‍यास निश्चितच उत्‍पादनात वाढ होते. केवळ सोयाबीन उत्‍पादकतेत वाढीवर भर न देता, त्‍यांचे विपणन तसेच मराठवाड्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योगात वाढीसाठी प्रयत्‍न केला जाईल.’’

‘‘या कार्यशाळेतून निघालेल्या निष्‍कर्षांचा शासनस्‍तरावर विचार करुन अंमलबजावणी करण्‍यात येईल. पुढील वर्षी सोयाबीन उत्‍पादन वाढीचे उद्दीष्‍ट ठेऊन राज्याचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, शेतकरी उत्पादक कंपन्या, सोयाबीन प्रक्रिया उद्योजक, प्रगतशील शेतकरी आदींनी ए‍कत्रित प्रयत्‍न करावे,’’ असेही त्यांनी सांगितले. डॉ. ढवण म्‍हणाले, ‘‘शेतकरी आणि शेतकरी उत्‍पादक कंपन्यांना दर्जेदार पायाभूत, प्रमाणित बियाणे देण्‍याकरिता विद्यापीठाने सोयाबीन बिजोत्‍पादनाचा महत्‍वकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.’’ 

या कार्यशाळेत सोयाबीन पिकाचे वाण, बीजोत्पादन तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, उगवणशक्ती, जिवाणू खतांचा वापर, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, आयात- निर्यात धोरण, विक्री व बाजार व्यवस्थापन, शासकीय, खासगी सहभाग (पीपीपी) प्रक्रिया उद्योग आदीं विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. प्रविण कापसे यांनी केले. आभार डॉ. विश्वनाथ कांबळे यांनी मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com