Sanjay Gaikwad Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture College : रखडलेले कृषी महाविद्यालय मार्गी लागण्याची शक्यता

Team Agrowon

Buldana News शासनाने जिल्ह्यात मंजूर केलेले कृषी महाविद्यालय (Agriculture College) अनेक वर्षांपासून रखडले आहे. या महाविद्यालयाबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिल्याची माहिती आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिली. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार गायकवाड विविध विकासकामांबाबत बोलत होते.

येत्या पंधरा दिवसांत कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेचा विषयदेखील मार्गी लागणार आहे. हे कृषी महाविद्यालय बुलडाणा शहरातील कृषी संशोधन केंद्राच्या जागेवर होण्यासाठी आपण आग्रही असून, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. हे कृषी महाविद्यालय सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी विकासकामांबाबत बैठक घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यामध्ये बुलडाणा शहरालगत कृषी महाविद्यालय सुरू करण्याच्या मुद्द्यांसह बोदवड उपसा सिंचन योजनेतून मोताळा तालुक्यातील शंभराहून अधिक गावांना पाणी, मोताळा व बुलडाणा तालुक्यांतील औद्योगिक वसाहतीचे निर्णय, बोथा जंगलात फ्लाय ओवरचे काम तसेच येळगाव नजीक वीस कोटी रुपयांच्या पर्यटन केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा विषय बैठकीत घेतला.

बोदवड परिसर उपसा सिंचन योजना आता केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून होणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून ११०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला मंजुरात मिळाली आहे.

यामध्ये मोताळा तालुक्यातील सुमारे ११२ गावे समाविष्ट असून, त्यामुळे सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. बुलडाणा-खामगाव मार्गावरील अभयारण्यात सुमारे ११ किलोमीटरच्या उड्डाण पुलाच्या कामासाठी सर्वेक्षणाचेही निर्देश देण्यात आले आहेत.

जागेच्या कारणाने रखडलेले महाविद्यालय

जिल्ह्यात कृषी महाविद्यालय मंजूर होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. हे कृषी महाविद्यालय मोताळा तालुक्यातील तळणी येथे करण्याबाबत ग्रामस्थांनी शासनाकडे सातत्याने मागणी केली. तर काहींच्या मते हे महाविद्यालय जिल्हा मुख्यालयी बुलडाण्यात झाले तर फायदेशीर होईल.

जागेच्या निवडीवरून दोन मतप्रवाह बनले होते. या ओढाताणीमध्ये महाविद्यालयाचा मुद्दा महिनोनमहिने बाजूला ठेवण्यात आलेला आहे.

आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य कार्यवाहीचे आदेश दिल्याने या वेळी तरी हा मुद्दा निकाली निघेल, अशी अपेक्षा कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT