Krushik Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Krushik Exhibition : बारामतीत कृषिक प्रदर्शनास उद्यापासून सुरुवात

अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी विज्ञान केंद्र बारामती अटल इनक्युबेशन सेंटर आयोजित १७० एकर वरील कृषिक-२०२३- कृषी प्रदर्शनास गुरुवार (ता. १९)पासून सुरुवात होत आहे.

Team Agrowon

बारामती : अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust) संचलित, कृषी विज्ञान केंद्र बारामती (KVK Baramati) अटल इनक्युबेशन सेंटर आयोजित १७० एकर वरील कृषिक-२०२३- कृषी प्रदर्शनास (Krushik Agriculture Exhibition) गुरुवार (ता. १९)पासून सुरुवात होत आहे.

हे प्रदर्शन सोमवार (ता. २३)पर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी दिली.

प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतून लाखो शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात. त्यासाठी १७० एकरांवरील पीक प्रात्यक्षिक पाहतानाचा शेतकरी फ्लो, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, येणाऱ्या शेतकऱ्यांची भोजन, चहा नाश्ता तसेच लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासाबाबत आढावा घेतला. प्रदर्शनामध्ये प्रत्येक प्लॉटवरती त्या पिकाचे माहितीचे बोर्ड, तसेच त्या ठिकाणी माहिती देणारी व्यक्ती असणार आहेत.

त्याचे नियोजन केले आहे. येथे असलेली १५३ जातींच्या भाजीपाल्याची ५२ पिके, शेतातील ५४ नावीन्यपूर्ण स्टार्टअप, फूल शेतीची २७ पिकांचे ११२ वाण, स्मार्ट मशिनरीचे १०८ प्रकार, १४ प्रकारचे खतांचे डेमो, व्हर्टिकल फार्मिंग, एनएफटी तंत्रज्ञान, आयओटी रोबोट सेन्सर आधारित स्मार्ट सिंचन, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञाची ४५ प्रात्यक्षिके, जवस बकव्हींट, हळवी, तसेच रब्बी हायब्रीड कांदा,

करडईच्या नवीन पीक पद्धती, सफरचंद, एव्हाकोडा, बारमाही फणस आदी ४७ जातींचे व ३३ फळ पिकांची रोपेनिर्मिती व विक्री, कोरडवाहू जमिनीसाठी अफलातून आंतरपीक पद्धती, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्त भरडधान्याची उत्पादन प्रक्रिया प्रात्यक्षिके इत्यादी अनेक गोष्टींसह २१० कंपन्यांचे स्टॉल्स त्या ठिकाणी पाहता येणार आहेत, त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

शरद पवार, अजित पवार भेटी देणार

पाच दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे गुरुवारी (ता. १९) प्रदर्शनास भेट देणार आहेत. तसेच २३ जानेवारी रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या प्रदर्शनास भेट देणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT