Team Agrowon
बारामतीत सुरू होणारे केंद्र हे वॉशिंग्टन नंतर जगातील केवळ दुसरे संशोधन केंद्र ठरणार आहे.
जगातले पहिले फार्म ऑफ फ्यूचर (भविष्यातील अत्याधुनिक शेती) (Farm Of Future) केंद्र बारामतीत सुरू करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा (Dr. Ranvir Chandra) यांनी बारामतीत केली.
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कृषी क्षेत्रासाठी हा पथदर्शी प्रकल्प म्हणून नोंदला जाईल.
उपग्रह, ड्रोन, रोबोट यांच्यासह तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अत्याधुनिक शेतीचे प्लॉट बारामतीत विकसित केले जाणार आहेत.
केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील भविष्याचा वेध घेणारी शेती मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट विकसित करणार असल्याचे चंद्रा यांनी नमूद केले.
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कमी खर्चात अधिक फायदा देणारी शेती हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून यात काम होणार आहे.