Water Conservation
Water Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : जलसंधारणाबाबत ‘युनिसेफ’ उच्च शिक्षण विभागात करार

Team Agrowon

मुंबई : ‘‘जलसंधारण आणि पर्यावरण (Environment) पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी ‘युनिसेफ’ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ७ लाख तरुण हवामान (weather) बदलाचे विद्यार्थी (Student) म्हणून कार्य करतील,’’ अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सोमवारी (ता.१४) मुंबई विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ‘युनिसेफ’ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र, उपसचिव अजित बाविस्कर, ‘युनिसेफ’च्या प्रमुख राजेश्‍वरी चंद्रशेखर, ‘एनएसएस’चे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वजंय, प्र. कुलगुरू अजय भामरे, प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळणकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘हवामान बदलाचा धोका आणि भविष्यातील पाण्याची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेऊन राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना राबविली. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, बदलत्या हवामानाला प्रतिसाद देण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी तरुणांना एकत्र आणण्याचा निश्‍चय केला आहे. या विषयांवर कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांची मदत घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.’’

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी म्हणाले, ‘नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. तरुणांमध्ये जलसंवर्धनाच्या सवयी रुजवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत. भविष्यातील बदलांना चालना देण्याबरोबरच राज्यातील जलसंवर्धनाचे कार्य अधिक वाढेल. यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये तरुणांची नोंदणी, प्रशिक्षण आणि संस्था, समुदायातील जलसंधारणाबाबत निवडक विद्यापीठांद्वारे कृती आराखडा याचा समावेश आहे.’’

राज्यातील धोकादायक पातळी तिसऱ्या स्थानी

कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्न्मेंट अॅण्ड वॉटर इंडियाने २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अहवालानुसार, आसाम आणि आंध्र प्रदेशनंतर हवामान धोक्याच्या पातळीवर असलेले महाराष्ट्र हे तिसरे राज्य आहे. या सहकार्य कराराचा उद्दिष्ट ‘युनिसेफ’च्या साहाय्याने पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे.

तीन टप्प्यांत प्रशिक्षण

युनिसेफच्या चंद्रशेखर म्हणाल्या, ‘‘आगामी काळामध्ये ‘युनिसेफ’ने हवामान बदलावर कृती आणि तरुणांचा सहभाग हा प्रमुख कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवला आहे. राज्यभरातील आणखी २४ लाख तरुणांद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात येईल. या अंतर्गत तरुणांना तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पाणी, पर्यावरण आणि शाश्‍वततेच्या मुद्द्यांवर सामूहिक कृती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.’’

या विद्यापीठांचा सहभाग

या प्रकल्पात एनएसएस युनिट, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा सहभाग असेल. तसेच हवामान बदलासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेण्यात येईल. शहरी भागातील पाण्याच्या वाढत्या समस्या आणि प्रदूषण लक्षात घेता ६० टक्के शहरी तरुणांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असेल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT