Sugarcane cultivation
Sugarcane cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane : सांगलीत आडसाली ऊस लागवड संथ गतीने

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात पावसाने (Rain) शिरा प्रारंभ केला असला तरी, यंदाही महापुराच्या (Flood) भीतीने शेतकरी ऊस लागवड (Sugarcane Cultivation) करण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे आडसाली ऊस लागवडीस (Sugarcane Farming) गती नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २२ हजार २४७ हेक्टरवर लागवड झाली असून वाळवा तालुक्यात सर्वाधिक आडसाली ऊस लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या (Agriculture Department) अहवालातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये महापूर आला होता, त्या वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. त्यामुळे वारणा आणि कृष्णा काठच्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करण्याचे नियोजन बदलले होते; मात्र २०२० मध्ये महापूर आला नसल्याने ऊस लागवड वेळेत केली होती. त्यानंतर २०२१ ला पुन्हा एकदा महापुराचा सामना वारणा आणि कृष्णा नदी काठच्या शेतकऱ्यांना करावा लागला होता. लागवड गेलेल्या शेतात पाणी साचले होते. त्यामुळे ऊस पिकाची उगवण व्यवस्थित झाली नाही. परिणामी ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

यंदाच्या हंगामात पावसाला उशिरा प्रारंभ झाला. त्यातच गेल्या दोन महापुरांचा फटका यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात ऊस लागवड केल्याचे काही साखर कारखानदारांनी सांगितले; मात्र, जिल्‍ह्यात अजून पुरेसा पाऊस झाला नाही. त्यातच वारणा आणि कोयना धरण पाणलोट परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी पात्रा बाहेर आले आहे. शेतात पाणी साचले आहे. महापुराच्या भीतीने शेतकऱ्यांनी ऊस लागवड थांबवली आहे.

रोपांची मागणी कमी

जिल्ह्यात ऊस रोपवाटिकांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर साखर कारखानेदेखील ऊस रोपांची निर्मिती करताहेत. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी, महापुराच्या भीतीने अद्याप ऊस रोपांची मागणी वाढली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तालुकानिहाय आडसाली ऊस लागवड स्थिती

तालुका....क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जत...३०

खानापूर...२१८७

वाळवा...१५३२५

तासगाव...२७२५

आटपाडी...२९९

पलूस...१६३०

कडेगाव...५१

एकूण...२२२४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT