Sugarcane FRP : उसाला प्रतिटन २००० ते २७२२ रुपये ‘एफआरपी’

परभणी जिल्ह्यातील सहा खासगी साखर कारखान्यांपैकी कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा शुगरचा साखर उतारा सर्वाधिक ११.७५ टक्के, तर लिंबा (ता. पाथरी) येथील योगेश्‍वरी शुगर कारखान्याने सर्वात कमी ९.५० टक्के आहे.
Sugarcane  FRP
Sugarcane FRPAgrowon

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी २०२१-२२ मध्ये गाळप (Sugarcane Crushing) केलेल्या उसाला प्रतिटन २००० ते २७२२ रुपये या दरम्यान एफआरपी (Sugarcane FRP) (रास्त किफायतशीर किंमत) दिली आहे. साखर उताऱ्यातील घट, जास्तीचा ऊस तोड (Sugarcane Harvesting) आणि वाहतूक खर्च दर्शविलेल्या कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना (Sugarcane Farmer) कमी एफआरपी मिळाली आहे.

Sugarcane  FRP
Sugarcane FRP : ‘श्रीलक्ष्मी नृसिंह’कडील थकीत एफआरपी द्यावी

परभणी जिल्ह्यातील सहा खासगी साखर कारखान्यांपैकी कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा शुगरचा साखर उतारा सर्वाधिक ११.७५ टक्के, तर लिंबा (ता. पाथरी) येथील योगेश्‍वरी शुगर कारखान्याने सर्वात कमी ९.५० टक्के आहे. आमडापूर येथील श्रीलक्ष्मी शुगर कारखान्याचा प्रतिटन ऊसतोड आणि वाहतूक खर्च सर्वाधिक ८१४.२० रुपये तर बळिराजा शुगरचा सर्वात कमी ६८४.९२ रुपये आहे. बळिराजा शुगर कारखान्यांने सर्वाधिक प्रतिटन २७२२.५८ रुपये, तर योगेश्‍वरीने सर्वात कमी प्रतिटन २०००.४२ रुपये एफआरपी दिली आहे. गंगाखेड शुगर, रेणुका शुगर या कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. योगेश्‍वरीने ९२.८९ टक्के, बळिराजाने ८५.४८ टक्के, श्रीलक्ष्मी नृसिंहने ९१.४१ टक्के, ट्वेन्टीवन शुगरने ९९.७६ टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे.

Sugarcane  FRP
Sugarcane FRP : ‘एफआरपी’त वाढीतील चलाखी

हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांपैकी वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.४८ टक्के, तर वाकोडी येथील शिऊर कारखान्याचा सर्वांत कमी १०.०७ टक्के आहे. भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचा प्रतिटन ऊसतोड आणि वाहतूक खर्च सर्वाधिक ७७५ रुपये, तर पूर्णा साखर कारखान्याचा सर्वांत कमी ७०५ रुपये आहे. पूर्णा साखर कारखान्याने सर्वाधिक प्रतिटन २६२४.२० रुपये, तर शिऊर कारखान्याने सर्वांत कमी प्रतिटन २१४८.३६ टक्के एफआरपी दिली आहे. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने ८६.९२ टक्के, पूर्णा कारखान्याने ९२.७९ टक्के, कपिश्‍वर कारखान्याने ९७.५८ टक्के, टोकाई कारखान्याने ७७.८५ टक्के, शिऊर कारखान्याने ९७.७३ टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे.

अनेक कारखान्यांनी वजनमापात खोट, रिकव्हरी चोरी, ऊस तोड आणि वाहतूक खर्च जास्त दर्शविला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाले. लेखा परीक्षण केल्यास कोट्यावधी रुपयाचे गैरप्रकार उघडकीस येतील.
विलास बाबर, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा

साखर कारखानानिहाय गाळप, ऊसतोड, वाहतूक खर्च (टनांमध्ये), नेट एफआरपी (रुपये) स्थिती

कारखाना...एकूण गाळप...साखर उतारा...एफआरपीनुसार दर....ऊसतोड, वाहतूक खर्च...नेट एफआरपी

बळिराजा शुगर, कानडखेड...८५९१५०...११.७५...३४०७.५०...६८४.९२...२७२२.५८

रेणुका शुगर, पाथरी...३२४७९५...११.७१...३३९५.९०...६९८.७०...२६९७.२०

श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर,आमडापूर...६३११३१...१०.५०...३०४५...८१४.२०...२२३०.८०

ट्वेन्टीवन शुगर, सायखेडा...७४७६८७...१०.४१...३०१८.९०...८१३.५६...२२०६.३४

गंगाखेड शुगर, माखणी...१२००६९७....१०.०१...२९०२.९०...७५३...२१४९.४०

योगेश्‍वरी शुगर, लिंबा...२९०४५४...९.५०...२७५५.००...७५४.५८...२०००.४२

पूर्णा ससाका, वसमत...६१८०७८...११.४८...३३२९.२०...७०५...२६२४.२०

टोकाई ससाका, कुरुंदा...२३३९४९...११.३८...३३००.२०...७३१...२५६९.२०

भाऊराव चव्हाण ससाका, डोंगरकडा...३२८०९६...११.४०...३३०६....७७५...२५३१

कपिश्‍वर शुगर, जवळा

बाजार...५०३७४६...१०.७२...३१०८.८०...७१५.८८...२३९२.९२

शिऊर साखर, वाकोडी...४६४५३७...१०.०७...२९२०.३०...७७१.४४...२१४८.८६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com