Eknath Shinde
Eknath Shinde  Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्यात कारभार सुरू

Team Agrowon

Nagar News : ‘‘शेतकरी देशाचा, समाजाचा कणा आहे. आम्ही शेतकरी आदर्श, केंद्रबिंदू मानून राज्याचा कारभार करत आहोत. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करता यावा, यासाठी सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

शिर्डी (ता. राहाता) येथील तीन दिवशीय राज्यस्तरीय पशुप्रदर्शन (महापशुधन एक्स्पो २०२३) चा रविवारी (ता. २६) मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

महसुल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार सुजय विखे, सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, जयकुमार गोरे, मोनिका राजळे, राहुल कुल, माजीमंत्री अण्णासाहेब मस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, माजी आमदार शिवाजी कर्डिले, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे-पाटील उपस्थिती होत्या.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय महत्त्वाचा आहे. पशुधनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती होत आहे.

त्यामुळेच पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत आहे. पूरक व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे.

पशुधन वाचविण्यासाठी लम्पी स्कीनच्या काळात पशुसंवर्धन विभागाने चांगले काम केले. लम्पी स्कीन मुक्त झालेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शेतकरी जगला तर समाज जगेल. शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे.

राज्यातील साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने सरकार काम करत आहे.’’ श्री. शिंदे यांच्या हस्ते ११ जाती, २४ प्रजातींमधील ७८१ जनावरांचे परिक्षण करण्यात आले. त्यातून ३१ पशुपालकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

‘‘महानंद’ला बळ द्या’

‘‘महानंद संस्था दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची आहे. सध्या ही संस्था डबघाईला आली आहे. त्या संस्थेला बळ द्या. गाई पालन वाढीसाठी व दूध उत्पादनाला गती देण्यासाठी गाई- म्हशीच्या भाकड काळात अनुदान द्या, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन छोट्या प्रमाणात करता यावे, यासाठी योजना सुरू करा,’’ अशी मागणी खासदार लोखंडे यांनी या वेळी केली.

बैलगाडीचे शिल्प देऊन सत्कार

पशुप्रदर्शन समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मान्यवरांचा शेतकरी गौरव म्हणून अकोले तालुक्यातील आदिवासी महिला शेतकरी गटाने तयार केलेल्या बैलगाडीचे शिल्प देऊन सत्कार करण्यात आला. हे बैलगाडीचे शिल्प या ठिकाणी आकर्षण ठरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

SCROLL FOR NEXT