Eknath Shinde : ‘बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे’

राज्यातील बळीराजावर संकट आले असून त्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. अडचणीच्या काळात मदतीसाठी मागेपुढे बघणारे आम्ही नाही.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Budget Session 2023 मुंबई ः ‘‘राज्यातील बळीराजावर संकट आले असून त्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. अडचणीच्या काळात मदतीसाठी मागेपुढे बघणारे आम्ही नाही.

त्यामुळेच कांदा उत्पादकांपासून (Onion Farmer) अवकाळीग्रस्तांपर्यंत (Rain Affected Farmer) सगळ्यांना या सरकारवर विश्वास आहे. सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत व्यक्त केला.

Eknath Shinde
Maharashtra Budget Session 2023 : तत्कालीन मुद्दे चर्चेत; सरकारची मूळ प्रश्‍नांना बगल

अंतिम आठवडा प्रस्ताव व नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ‘‘पूर्ण काळ अधिवेशन घेऊन विक्रमी कामकाज केले असून माध्यमातून व संवादातूनच जनतेचे प्रश्न सुटू शकतात. पंचामृताच्या योजनांतून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे,’’ असे या वेळी ते म्हणाले.

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार अशी ओळख धडाकेबाज निर्णयांमुळेच मिळाली आहे, डबल इंजिनमुळे या राज्यात विकासाचा वेग वाढला आहे. विकासाची बुलेट ट्रेन सुसाट निघाली असून आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी विविध योजनांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणावर दिला आहे.

Eknath Shinde
Maharashtra Budget Session 2023 : जोडे मारो आंदोलनावरून रणकंदन

सुमारे ३२ हजार ७८० कोटी केंद्र शासनाने महाराष्ट्राला दिले आहे. मुंबईतला एमटीएचएल प्रकल्प असो, किंवा कोस्टल रोड, मेट्रोची कामं, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग पकडला आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन वर्षाअखेरीस होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, ‘‘आनंदाचा शिधा हा पाडवा ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत देणार आहोत. बळीराजावर संकट आले आहे. एनडीआरएफचे नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली आहे. ५० हजारांपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देत आहोत.’’ मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकेचा भडिमार केला. राहुल गांधींचा निषेध केला

राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग उपराष्ट्रपतींकडे

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात विधानसभेत मांडण्यात आलेला हक्कभंग पुढील कारवाईसाठी राज्यसभा सभापतींकडे पाठवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी (ता. २५) विधानसभेत जाहीर केला.

या प्रकरणी संजय राऊत यांनी केलेला खुलासा अध्यक्षांनी अमान्य केला आहे. विधिमंडळाचा उल्लेख चोर मंडळ असा केल्याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी राऊत यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com