E-Peak Registration Agrowon
ताज्या बातम्या

E-Peak Registration : पीकपेरा नोंदविण्यासाठी दोन दिवसांची विशेष मोहीम

मोबाईल अॅपद्वारे पेरा नोंदविण्याचे आवाहन

Team Agrowon

नांदेड : जिल्ह्यातील शिल्लक शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पीकपेरा नोंदणी करावी यासाठी ता. ११ व १५ फेब्रुवारीदरम्यान जिल्हाभरात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई-पीकपेरा नोंदविण्याची मोहीम पार पाडण्यात येणार आहे.

पेरा नोंदीमुळे नैसर्गिक आपत्ती काळात मदत मिळणे होणार सुलभ

क्षेत्रीय स्तरावरून पीकपाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीकविमा आणि पीकपाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी आपापल्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीकपाहणी ॲप चालू करून त्यामध्ये पीकपाहणी नोंदविण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे.

पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी, पीककर्ज, पीकविमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीकपेरा नोंद गरजेची आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपमध्ये ई-पीकपेरा नोंद अचूकपणे करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Shakti Hackathon 2025: जल व्यवस्थापनासाठी ‘जलशक्ती हॅकेथॉन-२०२५’

NAFED Procurement Center: ‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शुकशुकाट

Soybean Future Ban: शेतीमालावरील वायदेबंदी उठविण्याच्या हालचाली

Agriculture Electricity: शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवणे वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग

Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्रच अव्वल

SCROLL FOR NEXT