Business idea Agrowon
ताज्या बातम्या

Startup Festival : स्टार्टअप फेस्टिव्हल होणार

‘‘जिल्ह्यात रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. यामुळे नव्याने उद्योग सुरू व्हावेत, असे वातावरण निर्मिती करावयाची आहे. स्थानिक आणि इतर नवउद्योजकांना चालना मिळण्यासाठी स्टार्टअप फेस्टिव्हल कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘जिल्ह्यात रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. यामुळे नव्याने उद्योग सुरू व्हावेत, असे वातावरण निर्मिती करावयाची आहे. स्थानिक आणि इतर नवउद्योजकांना (Entrepreneur) चालना मिळण्यासाठी स्टार्टअप फेस्टिव्हल (Startup Festival) कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी देशभरातील नव-उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोलापूर स्टार्टअप फेस्टिव्हल आयोजनाबाबत बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शासकीय तांत्रिक संशोधन व विकास परिषद नागपूरचे सदस्य सचिव केतन मोहितकर, मनपा उपायुक्त पुष्पगंधा भगत, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त सचिन जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू राजेश गडेवार, एम. एस. उडाशिवे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

स्टार्टअप फेस्टिव्हलच्या आयोजनासंदर्भात सर्व संबंधित विभाग, संस्था आणि इतर घटकांसमवेत प्राथमिक स्वरूपात कार्यक्रमाची रूपरेषा या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शंभरकर म्हणाले, ‘‘उद्योजकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ यांच्या साह्याने नावीन्यपूर्ण प्रकल्पनिर्मिती आदींसाठी प्रयत्न करण्यात येतील. देशभरातील १०० नवउद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT