Leopard Attack Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Attack : आई-वडिलांच्या कुशीतून बिबट्याने बालकाला पळविले

संगमनेरमधील घटना; ऊसतोड कामगारांनी बाळाला वाचविले

Team Agrowon

नगर ः आई-वडिलांच्या कुशीत कोपीत झोपलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून पळवले. मात्र ऊसतोड मजुरांनी पाठलाग करून बालकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी असून, नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द परिसरात घडली. वीरू अजय पवार (वय ३) असे जखमी बालकाचे नाव आहे.

संगमनेर तालुक्यात ऊसतोडणीचे काम करण्यासाठी मजूर दाखल झाले आहेत. आश्‍वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात लक्ष्मीमाता मंदिराजवळ संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी जळगाववरून आलेल्या मजुरांच्या २० कुटुंबांची तात्पुरती वस्ती वसविली आहे. मजुरांनी राहुट्या (कोप्या) केलेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री वीरू हा आई-वडिलांच्या कुशीत राहुटीत झोपला होता.

त्या वेळी बिबट्याने राहुटीत घुसून वीरूवर हल्ला केला. बिबट्या त्याला उचलून नेऊ लागला. धडपडीच्या आवाजामुळे जाग आलेल्या आई-वडिलांसह इतर मजुरांनी पाठलाग करून दीडशे ते दोनशे फूट अंतरावर वीरूची बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. बिबट्याच्या हल्ल्यात हनुवटीच्या खाली मानेवर दाताच्या जखमा झाल्याने वीरू गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्रारंभी प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ऊसतोड मजूर दहशतीच्या छायेखाली

सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ऊसतोडणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र बिबट्याच्या हल्ल्याने ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT