Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमानात मोठी वाढ; थंडी गायब

किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने राज्यातील थंडी गायब झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या वर सरकला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : किमान तापमानात (Minimum Temperature) मोठी वाढ झाल्याने राज्यातील थंडी (Cold) गायब झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या वर सरकला आहे. आज (ता. ५) राज्यात कोरड्या हवामानासह (Dry Weather), तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही किमान तापमानात चढ-उतार होत आहे. राजस्थानातील चूरू येथे रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र थंडी ओसरली आहे. दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश जमीनीवर येत असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. आकाश अंशतः ढगाळ होऊन, उकाडाही अनुभवायला मिळत आहे.

रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी ९.६ तापमान नोंदविले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पारा १६ ते २४ अंशांच्या दरम्यान होता. तर कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

कमी दाब क्षेत्र होणार तीव्र

बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आजपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत (ता. ७) ही प्रणाली तीव्र होईल. हे दाब क्षेत्र गुरूवारी (ता. ८) सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर पोचण्याचे संकेत आहेत.

रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.१ (१८.४), जळगाव ३१.७ (१७.६), धुळे ३१.० (१०.४), कोल्हापूर ३१.३ (२१.७), महाबळेश्वर २५.६(१७.१), नाशिक ३१.९ (२०.६), निफाड ३०.४ (९.६), सांगली ३१.९(२०.६), सातारा ३०.१(२१.८), सोलापूर ३३.२ (२१.३), सांताक्रूझ ३३.५(१८.८), डहाणू ३०.५ (२०.३), रत्नागिरी ३४.० (२३.५), औरंगाबाद ३०.२ (१६.४), नांदेड ३२.६ (२०.८), उस्मानाबाद ३१.३ (१७.४), परभणी ३०.९ (२०.०), अकोला ३२.७ (१८.०), अमरावती ३२.४ (१६.३), बुलडाणा ३०.४ (१९.०), ब्रह्मपूरी ३२.१ (१६.२), चंद्रपूर २८.८ (१७.८), गडचिरोली ३१.६(१३.०), गोंदिया २९.०(१३.५), नागपूर ३०.५ (१५.४), वर्धा ३०.९(१६.४), यवतमाळ ३१.० (१६.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: दुष्काळाचा पहिला ट्रीगर २६५ तालुक्यांत लागू, दुष्काळी सवलती मिळणार; पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Rainfall Records: दुष्काळ मूल्यांकनासाठी पाऊस, पीकस्थितीच्या अचूक नोंदी घ्या; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आदेश

Water Restriction: सांगली जिल्ह्यात उपसाबंदी शिथिल

Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू, शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळणार- कृषिमंत्री भरणे

Sindhudurg Eco Sensitive Zone: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

SCROLL FOR NEXT