Farmer Suicide
Farmer Suicide  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : कृषिमंत्री बसले समस्या जाणत; शेतकऱ्याने कवटाळले मृत्यूला

टीम ॲग्रोवन

‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ अभियानाची सुरुवात कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मेळघाटातील साद्राबाडीतून केली. बुधवारी (ता. ३१) रात्री कृषिमंत्री (Agriculture Minister Maharashtra) साद्राबाडी गावात मुक्कामी होते. गुरुवारीही (ता. १) त्यांनी या गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र याच कालावधीत साद्राबाडीपासून पाच किलोमीटर अंतरावरील लाकटू गावात एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) केली. अनिल सुरजलाल ठाकरे (वय २६) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सहा एकर शेती असलेल्या ठाकरे यांचे पीक संततधार पावसाने उद्ध्वस्त झाले. परंतु त्यानंतरही पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळे भरपाई मिळणार नसल्याने डोक्यावरील कर्ज आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी पैसा कुठून उभारावा? अशा संकटात ते सापडले होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. बुधवारी (ता. ३१) त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

कर्ज फेडता आले नाही अनिल ठाकरे यांनी खासगी कंपनीकडून फायनान्सवर ट्रॅक्टर खरेदी केला होता. परंतु त्याच्या हप्त्याची परतफेड त्यांना करता आली नाही. त्यामुळे कंपनीकडून ट्रॕक्टर उचलून नेण्यात आला होता. त्यासोबतच यंदा पावसामुळे पीकही उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT