Sugarcane Transport Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Transport : रिफ्लेक्टरविना ऊस वाहतूक आढळल्यास तक्रार करावी

राज्याचा ऊस गाळप हंगाम वेगात सुरू झाला आहे. ऊसतोडणी व वाहतुकीची धावपळ गावोगावी सुरू असताना अनेक भागांमध्ये ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरविना चालविली जात आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यात उसाची वाहतूक (Sugarcane Transport) करणाऱ्या वाहनांनी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर (Reflector) बसविण्याबाबत साखर आयुक्तांनी (Sugar Commissioner) खंबीर भूमिका घेतली आहे. “सूचना दिल्यानंतरही रिफ्लेक्टरविना वाहन आढळल्यास थेट साखर आयुक्तालयात (Sugar Commissionerate) तक्रार करावी. आम्ही अशा तक्रारींची दखल घेऊ” असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

राज्याचा ऊस गाळप हंगाम वेगात सुरू झाला आहे. ऊसतोडणी व वाहतुकीची धावपळ गावोगावी सुरू असताना अनेक भागांमध्ये ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरविना चालविली जात आहेत. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणे इतर वाहनांसाठी कमालीचे धोकादायक बनले आहे. रिफ्लेक्टर नसल्यास अंधारात चालणारी ऊस वाहतुकीची बैलगाडी किंवा ट्रॅक्टर ट्रेलर अजिबात दिसत नाही. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आदळण्याची शक्यता असते.

साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, नियमानुसार ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाड्या, अंगद, जुगाड, ट्रकला रिफ्लेक्टर बोर्ड (परावर्तीय फलक) किंवा रिफ्लेक्टिव्ह टेप (परावर्तीय फित) लावणे बंधनकारक आहे. ते नसल्यास मोटर वाहन कायद्याचा भंग केल्याचे गृहीत धरले जाते. ट्रेलरला मागील बाजूस लाल रंगाचा अखंड व डाव्या आणि उजव्या बाजूस पिवळ्या रंगाचा तसेच पुढील बाजूस पांढऱ्या रंगाचा रिफ्लेक्टर बोर्ड लावलाच पाहिजे.

“ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवले आहे की नाही याची काळजी वाहनमालकाने करून घेतली पाहिजे. ऊस वाहतूक करणारी वाहने महामार्गावर आल्यानंतर सेवा रस्त्यांचा (सर्व्हिस रोड) वापर करायला हवा. राज्यातील खासगी किंवा सहकारी साखर कारखान्यांच्या प्रशासनाने अपघात विरहित ऊस वाहतुकीसाठी ऊस वाहतुकदारांचे प्रबोधन करायला हवे,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अपघाताची कारणे...

रिफ्लेक्टर बोर्ड नसणे,

एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून वाहतूक करणे

मागील वाहन पाहण्यासाठी आरसा न लावणे

वाहनात कर्णकर्कश गाणी वाजवणे

चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे

रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT