Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe : जमीन बिगर शेती करण्यासाठी मागितली ३५ हजारांची लाच

निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीकची शेतीस बिगर शेती करण्याप्रकरणी ३५ हजारांची लाच स्वीकारताना निफाडच्या नायब तहसीलदार व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

टीम ॲग्रोवन

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीकची शेतीस बिगर शेती (NA Land) करण्याप्रकरणी ३५ हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना निफाडच्या नायब तहसीलदार व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक (Bribe In Arrest) केली. कल्पना शशिकांत निकुंभ (वय ५७) व कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे (वय ३८) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलत आजोबा व इतरांचे मौजे पिंपळगाव नजीक गटापैकी ८३०० चौ.मी. क्षेत्र बिगर शेती करायचे होते. त्यासाठी त्यांनी निफाड तहसीलमध्ये अर्ज केला. या प्रकरणात कार्यालयीन टिप्पणीवर सही करून ते तहसीलदारांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांना रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता नायब तहसीलदार निकुंभ यांच्या सांगण्यावरून संशयित कोतवाल अमोल कटारे याने प्रशासकीय इमारतीच्या पुरुष प्रसाधनगृहात लाचेची ३५ हजारांची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल बागूल, गायत्री जाधव, अजय गरुड, किरण अहिरराव, संतोष गांगुर्डे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT