Paddy Bonus Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Bonus : धानाला हेक्टरी २५ हजार रुपयांचा बोनस द्यावा

शासनाने धानाला दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.

टीम ॲग्रोवन

गडचिरोली : शासनाने धानाला दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १५ हजार रुपयांचा बोनस (Paddy Bonus) जाहीर केला आहे. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. शेतकरी हित जपायचे असेल, तर हेक्‍टरी २५००० रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर वैरागडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धानपीक वाचविण्यासाठी वारंवार मशागत करावी लागली. त्यातच बी-बियाण्यांचे वाढलेले भाव, पेट्रोल डिझेलच्या दरात झालेली वाढ या सर्वांतून मशागतीचा खर्चही वाढला.

त्यानंतरही उभे पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधांचा वापर करावा लागला. यामुळेच एकूणच उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. एकरी किमान १७ हजार रुपये खर्च आलेला असताना निव्वळ नफा मात्र दोन ते तीन हजारांचा झाला आहे. शेतकरी विवंचनेत आहेत.

१५ हजारांचा होनस तोकडा

या शेतकऱ्यांच्या हिताचा कैवार आणत राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले. परंतु ही मदत तोकडी असून, यामुळे शेतकरी अधिकच कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धानाला किमान २५ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बोनस देण्यात यावा. हा बोनस तीन हेक्टरच्या मर्यादेत असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana 21st Installment 2025: पंतप्रधान मोदींची ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची भेट; खात्यात २ हजार रुपये जमा

Hawaman Andaj: धुळ्यात निचांकी तापमानाची नोंद; राज्यात किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका कायम

Farmer Relief: सांगलीत शेतकऱ्यांच्या खात्यात २३.२९ कोटी अनुदान वर्ग

Smart Farming: मशागत यंत्रातील स्वयंचलन

Paddy Harvest: थंडीच्या लाटेत शेतकरी कामात गर्क

SCROLL FOR NEXT