Sugarcane Crushing  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : मराठवाड्यात ९८ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप

साठ कारखान्यांचा भाग; ८९ लाख क्विंटल साखर उत्पादन

Team Agrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील ६० कारखान्यांनी आजवर ऊस गाळपात (Sugarcane Crushing) सहभाग नोंदविला आहे. या कारखान्यांनी १ जानेवारी अखेरपर्यंत ९८ लाख ४५ हजार ६९५ टन उसाचे गाळप केले. तर ८९ लाख ४ हजार ४८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, अशी माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या हंगामात ऊस गाळपात सहभाग घेणाऱ्या मराठवाड्यातील कारखान्यांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक १२ कारखाने उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. त्या पाठोपाठ लातूर जिल्ह्यातील ११, नांदेडमधील ६, हिंगोलीतील ५, परभणी व औरंगाबादमधील प्रत्येकी ७, बीडमधील ८ व जालन्यातील सर्वात कमी ४ कारखान्यांनी आजवर ऊस गाळपात सहभाग नोंदविला आहे.

त्यात बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वात कमी ७.३८ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वात जास्त १०.१४ टक्के राहिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.७४ टक्के, औरंगाबादमधील कारखान्यांचा साखर उतारा ९.७१ टक्के, जालनामधील कारखान्यांचा उतारा ९.४८ टक्के, परभणीतील कारखान्यांचा उतारा ९.१९ टक्के, नांदेडमधील कारखान्यांचा उतारा ९.४८ टक्के तर

लातूर जिल्ह्यातील कारखान्यांचा उतारा ९.४९ टक्के राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

ऊस गाळप आणि साखर उत्पादन

जिल्हा ऊस गाळप (टनामध्ये) साखर उत्पादन (क्विंटल)

औरंगाबाद ८४८५९० ८२३७९०

जालना ९०३२७० ८५६४१०

बीड १३१०११३ ९६७०६०

परभणी ११०१७०० १०१२६९०

हिंगोली ७०८७१३ ७१८९८०

नांदेड ८३४५२० ७९११२५

लातूर १५५०८१३ १४७२०६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Banking: सामाजिक बॅंकिंगपासून दुरावल्या ग्रामीण बॅंका

Soybean Farmer Issue: सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा

Loan Disbursement: बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे : जिल्हाधिकारी डुडी

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

SCROLL FOR NEXT