Sugarcane Crushing : मराठवाड्यात ७३ लाख टन उसाचे गाळप

५६ कारखान्यांचा भाग; ६४ लाख क्विंटल साखर उत्पादित
 Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on


ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आतापर्यंत ५६ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला (Sugarcane Crushing) सुरुवात केली आहे. या कारखान्यांनी १९ डिसेंबर अखेरपर्यंत ७३ लाख ४७१ टन उसाचे गाळप करून ६३ लाख ९१ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

 Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : चाळीस लाख टन उसाचे गाळप

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप वेगाने सुरू झाले आहे. गाळपाला सुरुवात करणाऱ्या ५६ कारखान्यांमध्ये २३ सहकारी तर ३३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. २३ सहकारी साखर कारखान्यांमध्ये उस्मानाबादमधील चार, औरंगाबादमधील दोन, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी तीन, बीड व लातूरमधील प्रत्येकी पाच व नांदेडमधील एका सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. तर ३३ खासगी साखर कारखान्यांत उस्मानाबादमधील आठ, औरंगाबादमधील तीन, जालन्यातील एक, बीडमधील दोन, परभणीतील सात, हिंगोलीतील दोन, नांदेड व लातूरमधील प्रत्येकी पाच साखर कारखान्यांचा समावेश आहे.

 Sugarcane Crushing
मराठवाड्यात तीन कोटी २२ लाख टन उसाचे गाळप

आजवरच्या ऊस गाळतात उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी ८.०२ टक्क्यांचा साखर उतारा राखला आहे. औरंगाबादमधील कारखान्यांनी ९.४२ टक्के, जालन्यातील साखर कारखान्यांनी ९.०५ टक्के, बीडमधील साखर कारखान्यांनी ७.०७ टक्के, परभणीतील साखर कारखान्यांनी ८.८६ टक्के, हिंगोलीतील कारखान्यांनी ९.३० टक्के, नांदेडमधील कारखान्यांनी ९.११ टक्के तर लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ९.२४ टक्के साखर उतारा राखला आहे.

जिल्हानिहाय ऊस गाळप, साखर उत्पादन स्थिती
जिल्हा... कारखाने... ऊस गाळप (टनांत)... साखर उत्पादन (क्विंटल)
उस्मानाबाद... १२...२०१८४९१... १७४०३७०
औरंगाबाद... ५.... ६२५२१६... ५८९००५
जालना... ४.... ६८२५६३... ६१७६७०
बीड.... ७.... ९२०११०... ६५०२०५
परभणी... ७.... ७७८३२२.... ६६९५२५
हिंगोली... ५.... ५३५८९८.... ५२५०८०
नांदेड.... ६.... ६३५९५६.... ५७९२७०
लातूर.... १०.... ११०४९१५... १०२०४७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com