Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : जळगावात दहा तालुक्यांत ९० टक्क्यांवर पाऊस

जळगाव ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९५ टक्के पाऊस झाला आहे. भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, रावेर, यावल या पाच तालुक्यांनी शंभरी गाठली आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९५ टक्के पाऊस (Jalgaon Rainfall) झाला आहे. भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, रावेर, यावल या पाच तालुक्यांनी शंभरी गाठली आहे. तर उर्वरित तालुक्यांनी शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. सलग चार वर्षे जिल्ह्यात १०० टक्क्यांवर पाऊस (Rain Update) होईल, अशी स्थिती तूर्त आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस ५५८.४० मिलिमीटर पडतो. आतापर्यंत तो ५३०.३० मिलिमीटर झाला आहे. हा एकूण टक्केवारीच्या ९५ टक्के आहे. यामुळे यंदा पाणीटंचाई नसण्याची चिन्हे आहेत. सोबतच आगामी रब्बी हंगामही चांगले उत्पादन देणार असल्याचे पाणी अभ्यासक सांगतात.

सर्वांत कमी पाऊस झालेला तालुका पारोळा

पेरण्या झालेले क्षेत्र ९६ टक्के

मोठे, मध्यम प्रकल्पासाठी जलसाठा ८७.२३ टक्के

तालुकानिहाय झालेला पाऊस असा

तालुका पावसाची टक्केवारी

जळगाव ९१.५०

भुसावळ ८८.५०

यावल १०३.००

रावेर १०५.५०

मुक्ताईनगर १०७.३०

अमळनेर ९४.८०

चोपडा ९५.१०

एरंडोल ९४.००

पारोळा ७९.६०

चाळीसगाव १०६.९०

जामनेर ८८.९०

पाचोरा ८७.३०

भडगाव १०१.९०

धरणगाव ८०.७०

बोदवड ८५.३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT