Nagar News : नगर जिल्ह्यातील अनेक भागात आत्तापर्यंत अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याला उशीर झाला असला तरी अल्प पावसावरच आत्तापर्यंत खरिपाची पेरणी ८४ टक्क्यापर्यंत पोचली आहे. झालेल्या पेरणीत सोयाबीन, कापूस, तुरीच्या पेऱ्याने सरासरी ओलांडली आहे.
नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी आहे. यंदा साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज होता. त्यानुसार कृषी विभागाने बियाणे, खताची मागणी केली आहे. अल्प पावसाचा खरीप पेरण्यावर परिणाम झाला आहे. जोरदार पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या करता येईनात.
त्यातही जेथे पेरणी, अथवा कापसाची लागवड केली ती पीके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना चिंता लागली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीज पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.
आत्तापर्यंत खरिपाची ४ लाख ८५ हजार ०६९ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ८३.६७ टक्के पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनची १ लाख ३३ हजार ७५३ म्हणजे १५३ टक्के पेरणी झाली आहे.
कापसाची १ लाख ३० हजार ६०५ हेक्टरवर म्हणजे १०६.९८ टक्के लागवड झाली आहे. बाजरी हे खरिपातील प्रमुख पीक आहे. मात्र दिवसे न दिवस बाजरीचे क्षेत्र कमी होत आहे.
पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)
भात १७५४
खरीप ज्वारी ३५
बाजरी ५७,९५५
नाचणी ९९
मका ५६,४१५
तूर ४५,३३३
मुग १६,०९७
उडीद ३५,००२
भुईमूग ३,९१९
तीळ ५९
कारळे १९६
सूर्यफूल ११९
सोयाबीन १,३३,७५३
कापूस १,३०,६०५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.