Kharif Sowing : मराठवाड्यात अजूनही अपेक्षित पेरणी नाहीच

Kharif Season 2023 : मराठवाड्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर असून, प्रत्यक्षात ४४ लाख ९२ हजार ३१७ हेक्टरवरच खरिपाची पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर असून, प्रत्यक्षात ४४ लाख ९२ हजार ३१७ हेक्टरवरच खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रच्या तुलनेत अजूनही अपेक्षित पेरणी झाली नसल्याचे चित्र आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : पुणे विभागात खरिपात ७१ टक्के पेरण्या उरकल्या

यंदा सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा कायम आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार अति जोरदार पावसामुळे शेती पिकाचे नुकसान होते आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांसह परभणीतील बहुतांश भागांत पावसाची प्रचंड तूट आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : खानदेशात भुईमूग, सूर्यफूल पेरणी वाढणार

त्यामुळे त्याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७,१५२ हेक्टर इतके आहे, त्यामध्ये लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर, तर छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग अंतर्गत २० लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ४४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय खरिपाचे सर्वसाधारण

क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी

छ. संभाजीनगर ६८४७१६ ६२४१५० ९१.१५

जालना ६१९६९५ ५७५६४४ ९२.८९

बीड ७८५७८६ ७३९८०३ ९४.१५

लातूर ५९९४५६ ५७१४२६ ९५

धाराशिव ५०४७३५ ४८७४५४ ९७

नांदेड ७६६८०९ ७०३६४० ९२

परभणी ५३४९०० ४६१३११ ८६

हिंगोली ३६१०५४ ३२८९६८ ९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com