Soybean Disease Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Disease : मुळकूजमुळे ८० टक्‍के सोयाबीन बाधित

Soybean Root Rot : तालुक्‍यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या सुमारे ८० टक्‍के क्षेत्र यामुळे बाधित झाल्याने हे पीक हातचे गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पुसद तालुक्‍यात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर मुळकूजचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्‍यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या सुमारे ८० टक्‍के क्षेत्र यामुळे बाधित झाल्याने हे पीक हातचे गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ऐन शेंगा भरण्याच्या काळातच हे संकट आल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. दरम्यान या बाधित क्षेत्राची गुरुवारी (ता. २१) सांगवी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. विपुल वाघ यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांना व्यवस्थापनविषयक माहिती दिली.

पुसद तालुक्‍यातील वालतूर, भोजला, वनवारला शिवारात रोगग्रस्त पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत डॉ. वाघ यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली.

या वेळी त्यांच्या समवेत उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळधुळे, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे उपस्थित होते. आठ तालुक्‍यात डॉ. वाघ यांनी सोयाबीनची पाहणी केली. सर्वदुर या रोगाने पिकाचे मोठे नुकसान केले आहे. सोयाबीनच्या सर्व वाणांवर हा रोग पसरला असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात लवकरच अहवाल सादर केला जाईल.

पुसद तालुक्‍यात एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे ८० टक्‍के क्षेत्र बाधित असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. किडरोगाने संपूर्ण सोयाबीन हातचे गेले आहे. आता शासनस्तरावरुन होणाऱ्या पीक कापणी प्रयोगातून येणारे उत्पन्न व निघणारी आणेवारी यावर संपूर्ण भिस्त अवलंबून आहे. त्याआधारे शेतकऱ्यांना सरसकट विमा व शासनाकडून ठोस मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

शेतकरी आर्थिक संकटात

यंदा पावसाळा उशिरा सुरु झाला. त्यामुळे पेरणीस विलंब झाला. नंतर ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडला. यातून कसेबसे वाचलेले सोयाबीन अंतिम टप्य्यात रोगाला बळी पडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या खर्चाची भरपाई होणे देखील अशक्‍य झाले आहे. काही शेतकऱ्यांना काही किलो तर काहींना १-२ क्‍विंटलची उत्पादकता मिळेल, अशी स्थिती सर्वदूर आहे.

पिकांची नोंद ऑफलाइन घ्या

अनेकदा प्रयत्न करुनही बहुतांश शेतकऱ्यांना ॲपद्वारे ई पीक नोंदणी करता आलेली नाही. परिणामी पिकाच्या पेरणीची नोंद ऑफलाईन घ्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना अडवू

Sugarcane Price Cut: प्रतिटनामागे १५ रुपयांची कपात...! 'हा तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा', राजू शेट्टींचा आरोप, रोहित पवारांचाही सरकारवर हल्लाबोल

Agriculture Research: सहजीवी जिवाणूंमध्ये प्रथमच आढळली वैशिष्ट्यपूर्ण संरचना

Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच 

Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

SCROLL FOR NEXT