Seed Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Germination : सोयाबीन न उगवल्याच्या ७८ तक्रारी

Kharif Soybean : ऐन मोसमात पावसाने दगा दिल्यामुळे पेरण्या लांबल्या. कशीबशी पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता बियाणे उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी येण्यास सुरू झाली आहे.

Team Agrowon

Jalna News : ऐन मोसमात पावसाने दगा दिल्यामुळे पेरण्या लांबल्या. कशीबशी पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता बियाणे उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी येण्यास सुरू झाली आहे. ता. २४ जुलैपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या ७८ तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, पीक न उगवण्याचे कारण बोगस बियाणे आहे की कमी पर्जन्यमान असा पेच आता कृषी विभागासमोर निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात यंदा मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर पडला. त्यामुळे ता.१५ जुलैपर्यंतही शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या नाही. त्यात अनेक शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता उपलब्ध पाण्यावर पेरण्या पूर्ण केल्या.

शिवाय पेरणी सुरू होण्यापूर्वीच बियाणांची टंचाईही निर्माण झाली होती. नामांकित कंपनीचे बियाणे बाजारात उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेवटी मिळेत ते बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी उरकली होती.

मात्र, आता बियाणे न उगवण्याच्या तक्रारी येण्यास सुरवात झाली. ता.२४ जुलैपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ७८ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी ७३ ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली आहे.

मात्र, एका तक्रारीचा अंतिम अहवाल दिलेला नाही. त्यामुळे हे बियाणे न उगवण्याचे कारण बोगस बियाणे आहे, की कमी पर्जन्यमानात पेरणी केल्याचे कारण आहे, याचा शोध कृषी विभागाला घेणे आहे.

सोयाबीनबाबत ता.२४ जुलैपर्यंत तालुकानिहाय स्थिती

तालुका प्राप्त तक्रारी क्षेत्र (हेक्टरमध्ये पाहणी

जालना १५ २७ १५

अंबड १५ १४.६ १५

बदनापूर १७ १६.६ १७

भोकरदन ०९ ४.६ ०६

घनसावंगी १५ २७ १५

जाफराबाद ०३ ३.६ ०३

मंठा ०६ ६.८ ०६

परतूर ०१ ०.८ ०१

एकूण ७८ ८३.२० ७३

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ता.२४ जुलैपर्यंत जिल्ह्यातून ७८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७३ ठिकाणी स्थळपाहणी पूर्ण झाली. या संदर्भातील अंतिम अहवाल लवकरच देण्यात येणार आहे.
रवी राठोड, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक, कृषी अधीक्षक कार्यालय, जालना
बियाणे उगवण क्षमता कमी असल्याचे तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ४० तक्रारी महाबीज बियाण्यांसंदर्भात आल्या आहेत. पाहणी करून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके कारण कळेल.
एस. आर. मोहकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Wells: रखडलेल्या ११० सिंचन विहिरींना पुन्हा जीवदान

MahaDBT Seed Distribution: बियाणे वितरणात लोहा कृषी कार्यालयाची जिल्ह्यात आघाडी

Amit Shah: साखर कारखान्यांसाठी अमित शहांकडून मोठी घोषणा, कोल्हापुरात १,५०० कोटींचा संयंत्र प्रकल्प उभारणार

Malshiras Road Accident: माळशिरस वाहन अपघातप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीत

Stale Seedbed Technique: स्टेल सीडबेड तंत्र- तण नियंत्रणाचा सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT